(Image Credit : https://mostlyamelie.com)

जर तुम्ही हेल्थ कॉन्शिअस असाल तर अनेकदा तुम्ही जेवणाऐवजी सलाड ऑर्डर करता. परंतु, जेवणं स्किप करून सलाड खाणं खरचं हेल्दी आहे का? उत्तर कदाचित नाही असेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, असं का बरं? कारण सलाड तर हेल्दी असतं. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण जेव्हा आपण सलाड एखाद्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करतो, त्यावेळी त्या सलाडमध्ये अनेक पदार्थ एकत्र करून त्याला सलाडचं नाव देण्यात येतं. परंतु, हे सलाड आरोग्यासाठी हेल्दी नसतात. लोकांना असं वाटतं की, ते हेल्दी सलाड खात आहे, पण हा त्यांचा गैरसमज असतो. 

फार हेल्दी नसतं सलाड 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेलं सलाड फारसं हेल्दी नसतं. यामध्ये प्रिजर्व्ड फ्रूट्स तसेच अनेक क्रिमी पदार्थांचा समावेश करण्यात आलेला असतो. हे पदार्थ शरीरासाठी फारसे हेल्दी नसतात. 

सलाड खाणं आरोग्यासाठी फायदेशीर पण... 

अनेक लोक आहारात सलाडचा समावेश करतात. खरं तर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हलक्या शिजवलेल्या कच्च्या भाज्या खाऊन आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. परंतु, या पदार्थांचं खर्या पोषक तत्वांसोबत छेडछाड केली तर अनेकदा ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतात. अनेकदा भाज्या आणि फळं प्रिजर्व करण्यासाठी त्यांच्या पोषक तत्वांसोबत छेडछाड केली जाते. 

जेवणासोबत रिप्लेस करू नका सलाड 

दरम्यान, हेल्थ एक्सपर्ट सलाड खाण्याचा सल्ला देतात कारण, यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएट्सं आणि फायबर मिळतात. पण फक्त भाज्या असणारं सलाड जेवणासोबत रिप्लेस करू नये. कारण यांमध्ये प्रोटीन नसतं. अनेक व्यक्ती संपूर्ण आहार फक्त भाजीच्या सलाडासोबत रिप्लेस करतात. जर तुम्ही बराच वेळ प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला नाही तर शरीरामध्ये प्रोटीनची कमरता होते आणि यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सलाडचा आहारात अवश्य समावेश करावा. पण जेवणासोबत रिप्लेस करू नये. 

कसं असावं सलाड?

बेस्ट सलाड तेच असतं, ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, पेपर्स, काकडी, गाजर यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा. परंतु, प्लेन सलाड अनेक लोकांना अजिबात आवडत नाही, त्यामुळे कॅन्ड फ्रुट्स, क्रिमी ड्रेसिंग, फ्राय नूडल्स किंवा चीज या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. जे शरीरासाठी हानिकारक ठरतं. यामध्ये मुबलक प्रमाणात ऑइल, मीठ, सोडिअम आणि प्रिजर्वेटिव्स असतात. फ्राय चिकन आणि मायोनिज असणारं सलाडऐवजी एका बाउल कलरफुल भाज्यांच सलाड अत्यंत फायदेशीर ठरतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Is replacing meal with salad good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.