बाजारात मिळणारी कुल्फी विसरा; घरीच तयार करा मटका मलई कुल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 19:26 IST2019-05-14T19:23:16+5:302019-05-14T19:26:06+5:30
उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाती असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का?

बाजारात मिळणारी कुल्फी विसरा; घरीच तयार करा मटका मलई कुल्फी
उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाती असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? तुमचंही उत्तर नाही असेल. उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरीच हेल्दी आणि टेस्टी कुल्फी तयार करू शकता. आणि साधी कुल्फी नाही हा.... मटका कुल्फी. आता तुम्ही म्हणाल घरी कुल्फी करता येईल... तर उत्तर आहे, हो येईल. अगदी सहज, कमी वेळात तुम्ही घरच्या घरी मटका कुल्फी तयार करू शकता.
कुल्फी मुलांना फार आवडते. बाजारामध्ये तयार करण्यात येणाऱ्या कुल्फीमध्ये अनेक केमिकल्स तसेच शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या पदार्थांचाही समावेश करण्यात येतो. त्यामुळ घरीच तयार केलेली कुल्फी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
साहित्य :
- 2 कप दूध
- 1 कप क्रिम
- 1 कप कंडेन्स्ड मिल्क
- 1 टीस्पून वेलची पावडर
- ड्रायफ्रूट
- केशर
कृती :
- एका भांड्यामध्ये दूध तापवायला ठेवा.
- स्लो गॅसवर दूध उकळत ठेवा.
- त्यात क्रिम टाकून सतत ढवळत राहा
- त्यानंतर कंडेन्स्ड मिल्क टाका व व्यवस्थित एकत्र करा.
- मिश्रणामध्ये केशर व वेलची पूड टाकून दूध घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
- त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाका.
- मिश्रण थंड झाले की मातीच्या मडक्यांमध्ये भरा.
- मिश्रण व्यवस्थित सेट होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा.
- थंडगार मटका मलई कुल्फी तयार आहे.