Receipe of chili chees bread in marathi | टेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त 
टेस्टी अन् चीझी 'चिली चीझ ब्रेड'; खाण्यासाठी मस्त झटपट होईल फस्त 

पावसाळ्यात गरमा-गरम चहासोबत स्नॅक्स खाण्याची गंमत काही औरच... अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हीही अशाच नेहमीच्या पदार्थांना कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास पाककृती सांगणार आहोत. हा पदार्थ खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतो. तुम्ही लहान मुलांसाठीही हा पदार्थ तयार करू शकता. 

दिसायला सुंदर आणि खाण्यासाठी अत्यंत चिविष्ट असलेला हा पदार्थ तयार करायला वेळही फार कमी लागतो. तसेच घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही झटपट हा पदार्थ तयार करू शकता. 

थोडासा कुरकुरीत आणि चीझी ही पाककृती तुम्ही नक्की ट्राय करू पाहा, 

साहित्य : 

  • ब्रेड 
  • मिरची 
  • टोमॅटो
  • शिमला मिरची 
  • चीझ
  • आमचूर पावडर 
  • बटर
  • मीठ

 

कृती : 

- ब्रेडचे तुकडे कडा न काढता बटर लावून दोन्ही बाजूंनी तव्यावर खरपूस भाजून घ्यावं.

-  एका प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला टॉमेटो, बारीक चिरलेली रंगीत शिमला मिरची, किसलेले चीझ, चवीनुसार मीठ व आमचूर पावडर (चिमूटभर) भुरभुरून हे ब्रेडचे टॉपिंग स्लाइस तयार करून घ्यावे. 

- पॅनमध्ये ठेवून पुन्हा थोडं बटर घालून झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे शिजवून घ्या. 

- झाकण काढून कुरकुरीत करून घ्या. 

- मस्त यम्मी 'चिली चीझ ब्रेड' डब्यात द्यायला तयार. 

- तुम्हाला मिरची वापरायची नसल्यास चिली फ्लेक्स वापरू शकता.

- तुषार प्रीती देशमुख (लेखक प्रसिद्ध शेफ आहेत.)


Web Title: Receipe of chili chees bread in marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.