बटाटे फ्रिजमध्ये ठेवत आहात? असं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:51 IST2018-10-25T13:50:32+5:302018-10-25T13:51:16+5:30
अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो.

बटाटे फ्रिजमध्ये ठेवत आहात? असं पडू शकतं महागात!
अनेक खाद्यपदार्थ बराच काळ टिकवण्याच्या हेतूने आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. किचनमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रिज. फळं, भाज्या शिल्लक राहिलेलं जेवण स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिज उपयोगी पडतो. थोडक्यात सांगायचं झालचं तर फ्रिज अन्न वाया जाण्यापासून वाचवतो. परंतु फ्रिजचं थंड तापमान अनेकदा वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या होण्यासही कारणीभूत ठरतात. अशातच अनेक असे पदार्थ असतात की, जे फ्रिजमध्ये ठेवणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे बटाटा.
जेव्हा आपण बटाटा फ्रिजमध्ये ठेवतो त्यावेळी फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्यामधील स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यानंतर पुन्हा त्या साखरेचं रूपांतर एका केमिकलमध्ये होतं. अशा बटाट्यांचं सेवन केल्याने आपल्याला कॅन्सरचा धोका संभवतो.
फूड स्टँडर्ड एजेंसीद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या बटाट्यांना जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळी बटाट्यामध्ये असलेली साखर त्यातील एमिनो अॅसिज अस्परॅगिनसोबत मिसळून जाते. त्यामुळे एक्राइलामाइड नावाचं केमिकल तयार होतं.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, ज्या खाद्यपदार्थांमध्ये स्टार्च आढळून येतं ते पदार्थ तळताना, भाजताना किंवा बेक करताना, ज्यावेळी उच्च तापमानाच्या संपर्कात येतात त्यावेळी एक्राइलामाइड नावाचं केमिकल आढळून येतं. या केमिकलचा वापर पेपर बनवण्यासाठी, प्लास्टिक तयार करण्यासाठी आणि कपड्यांना डाय करण्यासाठी करण्यात येतो.
पहिल्यांदा 2002मध्ये एक्राइलामाइडबाबत समजलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत यावर अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. ज्यांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, जी लोकं उच्च तापमानामध्ये शिजवण्यात आलेले स्टार्च असणारे खाद्य पदार्थ खातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.
अमेरिकन कॅन्सर सोसायटच्या मते, बटाटे अजिबात फ्रिजमध्ये नठेवता ते नॉर्म रूम टेम्परेचरला आणि कोरड्या जागी ठेवावे. त्याचबरोबर अति उच्च तापमानावर बटाटे शिजवू नयेत.
फूड एक्सपर्ट्स आणि शेफ यांनी सांगितल्यानुसार, बटाटे शिजवण्याआधी त्याची साल काढून 15 ते 30 मिनिटांसाठी ते पाण्यामध्ये भिजत ठेवा. असं केल्याने बटाटे शिजताना त्यामध्ये एक्राईलामाइड केमिकल तयार होण्याची शक्यता कमी होते.