शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

वजन कमी करायचंय? मग 'हे' सूप नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 13:53 IST

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. एक्सरसाइज, डाएट आणि  थेरपीच्या मदतीने वजन कमी केलं जातं.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात. एक्सरसाइज, डाएट आणि  थेरपीच्या मदतीने वजन कमी केलं जातं. अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. डायबिटीस, हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर यांसारखे अनेक आजार जडण्याचाही धोका असतो. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. वाढत्या वजनामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तरी देखील आपण सर्वचजण आपल्या वाढणाऱ्या वजनाकडे दुर्लक्षं करतो. 

वजन कमी करण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर असते. काकडी हा पाण्याचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. काकडीचे सूपही तयार केले जाते. हे सूप टेस्टी असण्यासोबतच वेट लॉससाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. आतापर्यंत तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले असतील. पण हा उपाय अत्यंत सोपा आणि फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा देणाऱ्या डाएटची गरज असते. कारण जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कमी डाएट घेत असाल तर ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. परंतु, या वेट लॉस डाएटमुळे तुम्ही तुमचं वजन अगदी सहज कमी करू शकता आणि ऊर्जेची कमतरताही भासणार नाही. 

काकडीचं सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

- 2 मोठ्या काकड्या

- दीड कप दही

- 3 टेबलस्पून लिंबाचा रस

- 1 छोटा कांदा

- लसूण

- 1/4 ऑलिव ऑईल

- कोथिंबीर

- एक चनचा जीरं

- मीठ चवीप्रमाणे 

असं तयार करा काकडीचं स्वादिष्ट सूप 

काकडीचं सूप तयार करण्याची प्रक्रिया ही सोपी आहे. सूपसाठी लागणारं सर्व साहित्य हे ब्लेंडरमध्ये टाका. चांगल्या पद्धतीने ते ब्लेंड करा. त्यानंतर तयार केलेलं सूप एका कपमध्ये काढून घ्या. काकडी. दही, लिंबू यासह सूपमध्ये असलेले पदार्थ शरीराला फायदेशीर असतात. पण त्यासोबत ते वजन कमी करण्यासाठी मदतही करतात. 

काकडीच्या सेवनाने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. काकडीच्या पाण्यामध्ये हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात. याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. हे पाणी पोटातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. एका पूर्ण काकडीमध्ये 45 कॅलरी असतात. त्यामुळे याच्या काही तुकड्यांचे सेवन केल्याने शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण अगदी कमी प्रमाणात तयार होतात. काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात. एका काकडीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम आढळून येतात. ही सर्व पोषक तत्व आपल्य शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतात. 

काकडीचे पाणी शरीरला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन आढळून येतात. जे शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुम्ही काकडीपासून ज्यूस तयार करून त्याचेही सेवन करू शकता. काकडीमध्ये आढळून येणारं सिलिका त्वचेसाठी फायदेशीर असतं. यामुळे पिम्पल्स आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते. काकडी चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. तुम्ही यापासून फेस मास्क तयार करून तो चेहऱ्यावर लावू शकता. तसेच याचे स्लाइस डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सReceipeपाककृती