शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:12 PM2019-08-28T14:12:48+5:302019-08-28T14:13:09+5:30

ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात.

Benefits of rating raw or uncooked oats in weight loss and heart disease | शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर

शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर

googlenewsNext

ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. परंतु, नक्की ओट्स कोणत्या पद्धतीने खाल्यावर अधिक फायदा होते, याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? आपल्यापैकी अनेक लोक ओट्स शिजवून खातात. पण तुम्ही कधी कच्चे ओट्स खाल्ले आहेत का? जेव्हा गोष्ट कच्च्या पदार्थांची येते. त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर सलाड आणि फळं येतात. परंतु तुम्ही ओट्सही कच्चे खाऊ शकता. शिजवलेल्या ओट्सपेक्षा कच्चे ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. 

ओट्स शिजवून खाण्याऐवजी जर कच्चे खाण्याचा विचार करत असाल तर खाण्याआदी काही तास ओट्स पाण्यामध्ये भिजत ठेवा. कच्च्या ओट्समध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं. तरिसुद्धा काही लोकांना ओट्स शिजवून दलियाच्या स्वरूपात खाणं पसंत करतात. परंतु, हे ओट्स शिजवून खाल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात. कच्च्या ओट्समध्ये पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, कॅलरी, कार्बोहायड्रेट, चांगले फॅट्स, प्रोटीन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आढळून येतं. त्यामुळे हे भिजवून खाण्यं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया शिजवून खाण्याऐवजी भिजवून ओट्स खाण्याचे फायदे... 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर... 

कच्चे ओट्स खाऊन तुम्ही झटपट वजन कमी करू शकता. कारण यामध्ये हाय फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे बराच वेळ तुमचं पोट भरल्याप्रमाणे राहतं आणि तुम्ही ओवरइटिंगपासून दूर राहता. 

कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करतं... 

बीटा-ग्लूटन नावाचं विघटनशील फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे कच्चे ओट्स ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठी मदत करतात. हे कोलेस्ट्रॉल आणि बाल्स सॉल्ट शोषून फॅट्स पचवण्यासही मदत करतात. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. 

हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी 

कच्चे ओट्स खाल्याने ब्लड प्रेशरची समस्या कमी होते आणि त्यामुळे हृदयाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. त्यामुळे जर ब्लड प्रेशर योग्य असेल तर हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. 

आतड्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी 

दलिया खाणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं. परंतु, जर गोष्ट आतड्यांचं आरोग्य राखण्याची असेल तर कच्चे ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. भिजवून ओट्स खाल्याने पोटाचं आरोग्य राखण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. 

डायबिटीससाठीही फायदेशीर 

कच्च्या ओट्समध्ये बीटा-ग्लूकन असंत. जे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच इन्सुलिनचे प्रमाण राखण्यासाठीही मदत करतं. टाइप -2 डायबिटीजने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताहीदावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Benefits of rating raw or uncooked oats in weight loss and heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.