शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

तूप लावलेली चपाती खाण्याची लावा सवय; फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:44 PM

जर तुम्ही रिफाइंड ऑइलमध्ये तयार करण्यात आलेले पराठ किंवा चपात्यांचा आहारात समावेश करत असाल तर,जरा थांबा. असं करून तुम्ही तुमच्या आरोग्याची हेळसांड करत आहात.

जर तुम्ही रिफाइंड ऑइलमध्ये तयार करण्यात आलेले पराठ किंवा चपात्यांचा आहारात समावेश करत असाल तर,जरा थांबा. असं करून तुम्ही तुमच्या आरोग्याची हेळसांड करत आहात. रिफाइंड तेलामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. त्याऐवजी तुम्ही शुद्ध तूपाचा वापर करू शकता. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चपातीला तूप लावून खाणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तूपामुळे वजन वाढतं किंवा कोलेस्ट्रॉल, तर तुम्हाला तुमचा विचार बदलण्याची गरज आहे. कारण तूप आरोग्याच्या समस्या वाढवत नाही तर अनेक समस्यांवर उपचार करण्याचं काम करतं. 

एवढचं नाही तर चपातीमध्ये जर मर्यादित प्रमाणात तूप लावून खाण्यात आलं तर ते वजन कमी करण्यासाठी मदत करतं. डायटिशयन्सही चपातीला तेलाऐवजी तूप लावून खाण्याचा सल्ला देतात. तूप जेव्हा चपतीसोबत एकत्र होतं, त्यावेळी त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं, ज्यामुळे हे मधुमेहींसाठीही फायदेशीर ठरतं आणि ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी धडपडत असतात त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया चपातील तूप लावून खाल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

आहारात तूप लावलेल्या चपात्यांचा करा समावेश

1. जर तुम्ही वेट लॉस करण्याचा प्रयत्न करत असाल तर चपातीला तेल लावण्याऐवजी तूप लावून खा. कारण शुद्ध तूपामध्ये सीएलए असतं आणि हे मेटाबॉलिज्म अॅक्टिव्ह ठेवतं. यामुळे तुमचं वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. 

2. सीएलए इन्सुलिनचे प्रमाण कमी ठेवतं. एवढचं नाही तर जेव्हा तूप चपातीसोबत एकत्र येतं, तेव्हा त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं, ज्यामुळे हे रक्तामध्ये लगेच मिसळत नाही आणि ब्लड शुगरही नियंत्रणात राहते. एवढचं नाही तर यामुळे पोटही बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते. 

3. हृदयासाठीही तूप अत्यंत फायदेशीर ठरतं. चपातीला तेलाऐवजी तूप लावून खाल्याने हार्टला होणारे ब्लॉकेज दूर होतात. चपाती आणि तूप एका ल्यूब्रिकंट्सप्रमाणे हार्ट आणि ब्लड वेसल्सचं काम नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतं. 

4. तूपाचा स्मोकिग पॉइंट कमी असतो आणि त्यामुळेच तूपामुळे इतर तेलांपेक्षा जास्त धूर होतो. पदार्थ तयार करताना हा सहजपणे जळत नाही आणि त्यामुळेच हे पचण्यासाठी उत्तम असते. याचकारणामुळे तुम्ही जेव्हा चपाती आणि तूप एकत्र खाता, त्यावेळी पचनशक्ती उत्तम होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही तूप लावलेली चपाती अत्यंत फायदेशीर ठरते. 

5. तूपामुळे रक्त आणि आतड्यांमध्ये असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होतं, कारण यामुळे बाइलरी लिपिडचा स्त्राव वाढतो. जो शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. 

6. तूप आणि चपाती खआल्याने ब्लड सेल्समध्ये जमा झालेलं कॅल्शिअम कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्य पद्धतीने होतं. हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी मदत करतं. 

दररोज तूप खा परंतु प्रमाण निश्चित करा

तूप खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, परंतु जर हे प्रमाणापेक्षा जास्त खालं तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, दररोज फक्त एक टी स्पून तूपापेक्षा जास्त तूप खाऊ नका. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य