जगाने भारतावर प्रेम करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:34 IST2016-01-16T01:14:07+5:302016-02-07T12:34:04+5:30

जगाने भारतावर प्रेम करावे ेसार्‍या विश्‍वाने भारतावर प्रेम करावे, यासाठी मी प्रयत्न करेल, असे मनोगत मिस इंडिया सुपरनॅशनल २0१५ ची विजेती आफरीन रेचेल वाझ हिने व्यक्त केले आहे.

The world should love India | जगाने भारतावर प्रेम करावे

जगाने भारतावर प्रेम करावे

ाने भारतावर प्रेम करावे
ेसार्‍या विश्‍वाने भारतावर प्रेम करावे, यासाठी मी प्रयत्न करेल, असे मनोगत मिस इंडिया सुपरनॅशनल २0१५ ची विजेती आफरीन रेचेल वाझ हिने व्यक्त केले आहे. पुढील महिनाभराच्या काळात ती जगभरातील ७८ सौंदर्यवतींच्या स्पर्धेत उतरणार आहे. यात ती अजिंक्य ठरल्यास तिला 'सुपरनॅशनल २0१५'चा बहुमान प्राप्त होणार आहे. ४ डिसेंबर रोजी पोलंड येथे होणार्‍या या स्पर्धेविषयी तिची उत्कंठा वाढली आहे. भारताची छबी कशी सादर करायची याची योजना ती मनात तयार करीत आहे. तिच्या मनात थोडी भीतीही आहे. ती म्हणाली, मागील वर्षी आशा भट हिने हा बहुमान भारताला मिळवून दिला आहे. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. आफरीन ही एफबीबी फेमिना मिस इंडिया २0१५ च्या विजेत्यांपैकी एक आहे. मागील काही महिन्यांपासून ती स्पर्धेच्या तयारीसाठी विविध प्रशिक्षण घेत आहे. ती म्हणाली, कोणत्याही वियषावर कोणाशीही प्रभावी संवाद साधण्याचे सार्मथ्य आता माझ्यात आले आहे. यामुळे आत्मविश्‍वास वाढला आहे. आफरीन ही वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी असून ती मंगलोरला राहते. कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ती समाजकार्यही करते.

Web Title: The world should love India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.