छोटुशा झिवाच्या विश्वात रमला कोहली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 10:21 IST2016-03-30T17:21:39+5:302016-03-30T10:21:39+5:30

 विराट कोहली सध्या टी २० वर्ल्ड कप मध्ये उत्तम कामगिरी सादर करतो आहे. त्या

Virat Kohli in the world! | छोटुशा झिवाच्या विश्वात रमला कोहली !

छोटुशा झिवाच्या विश्वात रमला कोहली !

 
िराट कोहली सध्या टी २० वर्ल्ड कप मध्ये उत्तम कामगिरी सादर करतो आहे. त्याची इंडियन टीमच्या कॅप्टन धोनीसोबतची पार्टनरशिप अत्यंत लक्षात राहण्यासारखी आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या पार्टनरशिपमुळे भारताने अत्यंत कठीण प्रसंगातून टीमला विजयाकडे खेचुन नेले.

विराटने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्यात विराट धोनी फॅमिलीमधील एका छोट्या सदस्यासोबत म्हणजेच झिवा धोनीसोबत दिसत आहे. एम.एस.धोनी आणि साक्षी सिंग रावत हिची लहान मुलगी झिवा धोनी हिने कोहलीची फोन हातात घेतला आहे.

तिच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी विराट कसा गमवेल? तिच्या निरागस विश्वात विराट अगदीच रमला. तो देखील त्याच्या भूतकाळातील त्याच्या बालपणात गुंगला.

Web Title: Virat Kohli in the world!