शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेड एवढे जास्त आवडण्याचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 22:16 IST

ब्रेड किंवा पास्तामध्ये ‘स्टार्च’ ही स्वतंत्र चव असते आणि यामुळेच ते आपल्याला खायला एवढे आवडतात.

वडापाव असू द्या की पावभाजी, भारतीय असू देत की विदेशी लोक, सर्व जण ब्रेडयुक्त खाद्यपदार्थ अत्यंत चवीने खातात. असे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत होते आणि एक रंजक शोध त्यांना लागला. आतापर्यंत जगात केवळ पाच मूूळ चवी (गोड, आंबट, खारट, कडू आणि उमामी) असतात, असे मानले जायचे. परंतु शास्त्रज्ञांना वाटते की, या व्यतिरिक्त सहावी चवसुद्धा असते.ओरेगान स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार ब्रेड किंवा पास्तामध्ये ‘स्टार्च’ ही स्वतंत्र चव असते आणि यामुळेच ते आपल्याला खायला एवढे आवडतात. यापूर्वी असे मानले जात असे की, कार्बोहायड्रेट पदार्थांमध्ये असणाऱ्या गोडव्यामुळे ते आपल्याला आवडतात. परंतु या नव्या संशोधनात ‘स्टार्च’ गोडपणापासून वेगळी अशी स्वतंत्र चव असते असे दिसून आले.यामध्ये संशोधकांनी सहभागी स्वयंसेवकांना विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट मिश्रण चाखण्यास दिले. बहुतांश स्वयंसेवकांनी चॉकलेट किंवा तत्सम गोड मिश्रणांपेक्षा पीठाची चव असणारे जटील कार्बोदकयुक्त मिश्रणांना पसंती दर्शवली. जीभेवरून गोड चव नाहीशी करणारी संयुगे स्वयंसेवकांना दिल्यावरही त्यांनी ब्रेड आणि पास्तासारख्या पदार्थांना प्राधान्य दिले. याचा अर्थ की, गोडव्यामुळे नाही तर स्टार्चमुळे लोकांना हे पदार्थ आवडतात.आपण जे काही पदार्थ खातो, त्यांची चव ही या पाच चवींच्या मिश्रणातूनच बनलेली असते. आता या नव्या संशोधनामुळे त्यामध्ये आणखी एक चव वाढवावी लागणार असे दिसतेय.