शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भूतानच्या शाहीघराण्यात राजपुत्राचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:51 IST

 थिंपूमध्ये राजघराण्याच्या माध्यम कार्यालयाने या वृत्ताची अधिकृत घोषणा केली

भूतानच्या शाहीघराण्यात राजपुत्राचा जन्मराजे जिग्मे खिसर नामग्याल वांगचूक आणि राणी जेत्सून पेमा यांच्या कुटुंबात शुक्रवारी राजपुत्राचा जन्म झाला आहे. थिंपूमध्ये राजघराण्याच्या माध्यम कार्यालयाने या वृत्ताची अधिकृत घोषणा केली. ३५ वर्षीय वांगचूक यांचे शिक्षण आॅक्स्फोर्डमध्ये झाले आहे. त्यांनी 2011 मध्ये बौद्ध पद्धतीनुसार 25 वर्षीय जेत्सून पेमा यांच्याशी विवाह केला होता. बाळ आणि मातेची प्रकृती उत्तम असल्याचे वृत्तात म्हटले आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी वांगचूक हे राणीच्या बाजूला उपस्थित होते. मागील नोव्हेंबरमध्ये वांगचूक यांनी त्यानच्या पहिल्या बाळाचे आगमन होणार असल्याचे वृत्त दिले होते. विवाहापूर्वी वांगचूक यांनी आपल्या भावी पत्नीविषयी जाहीर माहिती दिली होती. माध्यमांत दोघांची हातात हात घेतलेली छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. वांगचूक हे 2008 मध्ये त्यांचे वडील राजे जिग्मे सिंघये वांगचूक यांची वारसदार म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्यांनी भूतानच्या लोकशाहीकडे प्रवासासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी देशात प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या होत्या. असे असले तरी देशावर अजूनही या राजघराण्याचा मोठा प्रभाव आहे. 1999 मध्ये या देशात इंटरनेट आणि दृरचित्रवाणी या सोयींचे आगमन झाले