जिंदालच्या मुलाचे ‘व्हिएन्ना’मध्ये राजेशाही विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 15:39 IST2016-04-12T22:39:25+5:302016-04-12T15:39:25+5:30

सज्जन जिंदाल यांच्या मुलाचे लग्नदेखील अशाच प्रकारे एकदम राजेशाही थाटात साजरे केले जाणार आहे. 

Rajnath's wedding in Jindal's 'Vienna' | जिंदालच्या मुलाचे ‘व्हिएन्ना’मध्ये राजेशाही विवाह

जिंदालच्या मुलाचे ‘व्हिएन्ना’मध्ये राजेशाही विवाह

रतामध्ये लग्न म्हणजे जीवनातील सगळ्या मोठा सोहळा असतो. न केवळ नवरदेव-नवरीसाठी तर दोघांच्या कुटुंबांसाठीदेखील खूप महत्त्वाची गोष्ट असते.

सध्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्याचा ट्रेंड खूप चालत आहे. सर्व पाहुणे मंडळींना घेऊन मस्तपैकी एखाद्या प्रेक्षणीय शहरात ‘शान-ए-शौकत’मध्ये धुमधडक्यात लग्न केली जातात.

सज्जन जिंदाल यांच्या मुलाचे लग्नदेखील अशाच प्रकारे एकदम राजेशाही थाटात साजरे केले जाणार आहे. युरोपातील आॅस्ट्रेया देशाची राजधानी व्हिएन्ना शहरात होणार आहे. सर्व सोहळयाची प्लॅनिंग पाहता हा व्हिएन्नातील हा सर्वात आलिशान लग्नसोहळा ठरणार यात काही शंका नाही.

लग्नासाठी एकुण एक हजार लोक उपस्थित असणार आहेत. 800 पाहुणे आणि दोनशे कर्मचाऱ्यांचा ताफा पार्थ जिंदाल आणि  अनुश्री जसानी यांच्या लग्नाला राहणार आहे. मोझार्टचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्हिएन्नातील जवळपास सर्व फाईव्ह स्टार हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. 

तीन दिवस चालण्यारा विवाह सोहळा आॅस्ट्रेयाच्या पूर्व रॉयल फॅमिलाच्या ‘बेल्वेडेरे पॅलेस’मध्ये होणार आहे. या संपूर्ण आयोजनाशी निगडित एकाने माहिती दिली की, या शहराने कधीही न पाहिलेले हे सर्वात मोठे लग्न ठरणार आहे.

Parth And Anushree

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रशियन आॅपेरा सिंगर अ‍ॅना नेट्रेब्कोचे लग्न झाले होते. परंतु त्यामध्ये केवळ 180 पाहुणे होते. त्यामुळे जिंदाल आता भारतीय कोट्यधीशांमध्ये लग्नासाठी ‘व्हिएन्ना’च्या निमित्ताने नवीन डेस्टिनेशन प्रसिद्ध करणार यात शंका नाही.

Web Title: Rajnath's wedding in Jindal's 'Vienna'