शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा!

By madhuri.pethkar | Updated: December 28, 2017 18:14 IST

कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात.

ठळक मुद्दे* कांद्यामध्ये सल्फर हा घटकही मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच कांदा जर केसांसाठी वापरला तर केसांचं गळणं कमी होतं.* कांद्यामध्ये असलेल्या अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टमुळे केस लवकर पांढरे होत नाही.* कांद्यामुळे केस छान चमकदार होतात.

- माधुरी पेठकरआपल्या केसांवर प्रेम नाही अशी मुलगी किंवा स्त्री सापडणं विरळच. त्यातही लांबसडक केसांची हौस असलेल्या तर अनेकजणी आहेत. अर्थात हौस आहे म्हणून प्रत्येकीचेच केस लांबसडक असतात असं नाही. पण केस लांबसडक होण्यासाठी काहीही उपाय करायला मुली आणि स्त्रिया तयार असतात. ब्युटी पार्लरमधल्या हेअर ग्रो ट्रीटमेण्टपासून ते खास हेअर क्लिनिकमध्ये जावून लांबसडक केसांसाठी गोळ्या औषधं खाण्यापर्यंत काहीही करायला त्या तयार असतात.

‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ या म्हणीप्रमाणेच आहे हे. खरंतर केस वाढवण्याचे, दाट करण्याचे उपाय खरंतर कोण्या पार्लरच्या किंवा हेअर क्लिनिकच्या हातात नसून आपल्याच हातात आहे. हा उपाय आपल्या घरात चक्क आपल्या स्वयंपाकघरात आहे. हा उपाय आहे कांद्याचा.

 

उग्र वासाचा कांदा आणि केसांना लावायचा.. अशक्य आहे हे . हे असं जरी वाटत असलं तरी हा उपाय केस लांब करण्यासाठी हमखास लागू पडणारा आहे.कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात.कांद्यामुळे केस लांब होतात हे मान्य पण हा कांदा केसांना लावावा कसा? असा प्रश्न पडला असेल तर कांदा केसांना लावायची पध्दत वाचा आणि नुसतीच वाचू नका तर कांदा केसांना लावून पाहा!केसांना कांदा कसा लावाल?

* कांदयाचं वरचं साल सोलून घ्यावं. आणि कांदा बारीक चिरून घ्यावा.

* चिरलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटावा. अगदी त्याची बारीक आणि मऊ गर होईल असा वाटावा.

* नंतर हा गर गाळणीवर ठेवून किंवा कापडात गुंडाळून पिळून काढून रस काढावा.

* कांद्याचा रस आपण नेहेमी केसांना जे तेल लावतो त्यात मिक्स करावा.

* तेल आणि कांद्याचा रस एकत्र केलेलं मिश्रण केसांच्या मुळांशी लावावं. या मिश्रणानं हलका मसाज करावा.

* पाऊण ते एक तास कांद्याचं मिश्रण केसांवर राहू द्यावं. मग केस शाम्पूनं धुवावेत. हा कांद्याचा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावा. काही आठवडे नियमित हा उपाय केल्यास केसांच्या लांबीत आणि मजबुतीत गुणात्मक वाढ झालेली नक्की आढळून येईल.कांद्यामध्ये पोटॅशिअम आणि अ, क आणि इ जीवनसत्त्वं असतात याचा फायदा केसांचं पोषण होण्यासाठी होतो. कांद्यामध्ये सल्फर हा घटकही मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच कांदा जर केसांसाठी वापरला तर केसांचं गळणं कमी होतं. कांद्यामध्ये असलेल्या अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टमुळे केस लवकर पांढरे होत नाही. आणि केस छान चमकदारही होतात.