पोलोसाठी मी खूप त्याग केलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:30 IST2016-01-16T01:19:58+5:302016-02-12T01:30:19+5:30

रिनाल्डी पोला कप स्पर्धेत रिना शहा ही खेळाडू संघमालक म्हणून सहभागी आहे. या खेळासाठी तिने खूप त्याग केलाय.

I have sacrificed a lot for Polo | पोलोसाठी मी खूप त्याग केलाय

पोलोसाठी मी खूप त्याग केलाय


/>. पोलो या खेळात फाऊल झाला, काही व्यत्यय आला तर टाईम आऊट दिला जातो. वैवाहिक आयुष्यात सेटबंॅक बसूनही तिने आयुष्यात टाईम आऊट घेतलेला नाही. वैवाहिक आयुष्यात वादळ झेलूनही रिनाचे पोलोवरील प्रेम कायम राहिले. फॅशन डिझायनर असलेली ४0 वर्षीय रिना म्हणाली, ''होय. पोलोवर माझे अर्मयादित प्रेम आहे. यासाठी मी खूप त्याग केलाय. मला पर्सनल आणि सोशल लाईफदेखील नाही. मी रात्री जागत नाही. पहाटे लवकर उठून सरावाला सुरुवात करते. मी पोलोला वेळ दिला नाही, असा दिवस माझ्या आयुष्यात अद्याप उगवलेला नाही.'' रिनाने मुंबईस्थित बिझनसमॅन संजय जिंदाल यांच्याशी या वर्षीच्या प्रारंभी विवाह केला होता. मात्र, लवकरच ते विभक्त झाले.

Web Title: I have sacrificed a lot for Polo