शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'फॉच्यरुन'च्या यादीत भारतीय वंशाचे 5 तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:28 IST

दिव्या सूर्यदेवरा : पाच भारतीयांपैकी सर्वांत आघाडीवर असलेले हे नाव.

दिव्या सूर्यदेवरा : पाच भारतीयांपैकी सर्वांत आघाडीवर असलेले हे नाव. त्यांना 40 जणांच्या यादीत चौथा क्रमांक देण्यात आला आहे. जनरल मोटर्स असेट मॅनेजमेंटमध्ये त्या सरव्यवस्थापक आणि सीईओदेखील आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असून त्या आधी याच कंपनीत 2013 पासून सीआयओ होत्या. 2014 मध्ये त्या सीईओ झाल्या. 36 वर्षीय दिव्या या मूळच्या चेन्नई येथील आहेत.वसंत नरसिम्हन : नरसिम्हन यांचा या यादीत सातवा क्रमांक आहे. स्वीस फार्मास्युटिकल्सच्या नोवार्टिस विभागाचे ते जागतिक प्रमुख (विकास) म्हणून मागच्या वर्षीपासून काम पाहात आहेत. ते औषधी विकास कार्यक्रम राबवितात. यात 966 कर्मचारी असून 143 प्रकल्पांचा समावेश आहे. यात 500 औषधांची चाचणी केली जाते. आठ वर्षांपूर्वी त्यांनी या कंपनीत पाऊल ठेवले होते.
आनंद स्वामीनाथन : स्वामीनाथन हे असेंचर डिजिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यादीत त्यांचा क्रमांक 18 वा आहे. नवीन व्यवसायसंधी शोधणे, निर्माण करणे, पुढील वर्षांची ध्येयधोरणे आखणे आदींची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या युनिटमध्ये 30,000 लोक कार्यरत आहेत. या कंपनीत त्यांनी तब्बल 19 वर्षे घालविली आहेत. आतापर्यंत त्यांनी 45 पेक्षा जास्त व्यावसायिकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे.
अपूर्व मेहता: मेहता यांनी 2012मध्ये इन्स्टाकार्टची स्थापना केली. तेव्हा ते केवळ 26 वर्षांचे होते आणि अँमेझानमध्ये कार्यरत होते. इन्स्टाकार्ट ही ऑनलाईन मार्केटिंग कंपनी आहे. प्रामुख्याने दैनंदिन वापराच्या वस्तू पुरवण्याचे काम ही कंपनी करते. या यादीत मेहता यांचा क्रमांक 23वा आहे. यापूर्वी फोर्ब्सच्या '30 अंडर 30' मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. मूळचे ते विद्युत अभियंता असून वाटर्लू विद्यापीठाचे पदवीधर आहेत.
रेशमा सौजनी : रेशमा या 'गर्ल्स हू कोड'च्या संस्थापक आहेत. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या मुलींना मार्गदर्शन करणारी ही कंपनी आहे. रेशमा यांनी येल विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली असून त्या सध्या 39 वर्षांच्या आहेत. त्यांनी पाच वर्षांआधी अमेरिकेच्या राजकारणातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. व्यापार क्षेत्रात अत्यंत प्रभावशाली कामगिरी करणार्‍या तरुणांची 'फॉच्यरुन'च्या '40 अंडर 40' यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये समाविष्ट होण्याचा बहुमान पाच भारतीय वंशाच्या तरुणांनी मिळवला आहे. यापैकी दोघांनी अमेरिकन व्यापार क्षेत्रात आपला जम बसविला आहे. मुख्य म्हणजे या पाच जणांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. दिव्या सूर्यदेवरा (सरव्यवस्थापक, जनरल मोटर्स असेट मॅनेजमेंट) आणि रेशमा सौजनी (गर्ल्स हू कोड) या दोघींशिवाय आनंद स्वामीनाथन (अँकसेंचर डिजिटल), अपूर्व मेहता (इन्स्टाकार्ट) आणि वदंत नरसिम्हन (नोवार्टिस फार्मास्युटिकल्स) यांचा या यादीत समावेश आहे. मुख्य म्हणजे ही पाचही नावे प्रथमच समाविष्ट झाली आहेत. मागील वर्षी भारतीय वंशाच्या चार जणांचा या यादीत समावेश झाला होता. यात हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक राज चेट्टी, मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक आणि सीईओ राहुल शर्मा, स्नॅपडीलचे सहसंस्थापक आणि सीईओ कुणाल बहल, ट्विटरच्या कार्यकरी चमूतील एकमेव महिला विजया गाड्डे यांचा समावेश होता.