मोदींसाठी जेवण बनविल्याचा अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:50 IST2016-01-16T01:19:48+5:302016-02-07T13:50:15+5:30

प्रसिद्ध स्वयंपाकी (शेफ) विकास खन्ना याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विदेश दौर्‍यात टेस्टी ...

The euphoria of making a meal for Modi | मोदींसाठी जेवण बनविल्याचा अत्यानंद

मोदींसाठी जेवण बनविल्याचा अत्यानंद

रसिद्ध स्वयंपाकी (शेफ) विकास खन्ना याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विदेश दौर्‍यात टेस्टी जेवण तयार केले होते. या डीनरसाठी वेगवेगळ्य़ा कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते. मोदी यांच्यासाठी जेवण बनविल्याचा खन्ना यांना अत्यानंद झालाअसून, आकाश ठेंगणे झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.



भारतीय ध्वजावर मोदींनी स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला. मात्र, काहीही असले तरी मोदींसाठी जेवण बनविण्याचा प्रसंग अविस्मरणीय असल्याचे त्याने म्हटले आहे. भारतीय जेवणाचे वैशिष्ट जगासमोर मांडण्याची अशा निमित्ताने संधी मिळते, हेही अभिमानास्पद असल्याचे त्याचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वादीष्ट जेवण बनविल्यानंतर मोदींनीही त्याची स्तुती केली होती. मात्र, अत्यानंद या वेळी झाला, ज्यावेळी मोदींनी आपल्याला अलिंगन दिले आणि तुझ्याबद्दल अभिमान वाटतो, असे म्हटले. ध्वजावरील स्वाक्षरी प्रकरणाबद्दल कुठेही माहिती शेअर करू नका, असे सांगण्यात आल्याचेही त्याने म्हटल्याचे समजते.

Web Title: The euphoria of making a meal for Modi