बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण नेहमीच आपल्या स्टाइल, फॅशन आणि आउटफिट्सच्या चॉइससाठी चर्चेत असते. मग तिचा बार्बी इन्स्पायर्ड मेट गाला लूक असो किंवा ब्लॅक अॅन्ड व्हाइट बिग बो असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 मधील लूक किंवा मग तिचा नियॉन कलरचा रफ्फल आणि फ्रिल असलेला लूक असो. दीपिका नेहमीच आपल्या अदांनी आणि फॅशन स्टाइल्सने चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. 

सध्या सगळीकडे चर्चा आहे दीपिकाच्या लूकची नाही तर एका छोट्याश्या बॅगची. करीना कपूर, सोनम कपूर आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींप्रमाणेच दीपिका पादूकोणही ब्रँड कॉन्शिअस आहे. ती नेहमीच महागडे हॅन्डबॅग्ज आणि अक्सेसरीज कॅरी करताना दिसून येते. मागील काही दिवसांपूर्वी दीपिका दिसून आली ओवरसाइज्ड व्हाइट टी-शर्ट, ब्लॅक लेगिंग्स, बेज कलरचा ओव्हरकोट आणि व्हाइट स्पोर्ट्स शूजमध्ये. 

दीपिकाचा लूक तसा कॅज्युअल असला तरिही सर्वांच लक्ष मात्र तिच्या हातातील एका छोट्याशा बॅगने वेधून घेतलं. तिच्या हातातील निऑन कलरची छोटीशी स्लिंग बॅग पाहून तुम्हाला ती साधी वाटेल. पण तिच्या आकाराकडे जाऊ नका आणि लक्षात ठेवा ती दीपिका पादूकोणची बॅग आहे.

तुम्ही त्या बॅगच्या किमतीचा अंदाज जास्तीत जास्त किती लावू शकता? वीस हजार, 30 हजार नाहीतर... 50 हजार?

दीपिकाच्या हातात दिसून आलेली नियॉन कलरची स्नेकस्किन डिझाइन असलेली स्लिंग बॅग तब्बल 1 लाख 16 हजार रूपयांची आहे. दीपिकाच्या एअरपोर्ट लूक आधीही ही बॅग दीपिकाकडे दिसून आली होती.

कान्स फेस्टिव्हलमध्ये ब्लॅक कलरच्या गाउनसोबत ही छोटुशी बॅग कॅरी करताना दीपिका दिसली होती. 

दीपिकाच्या या बॅगची किंमत ऐकल्यावर आपल्यापैकी प्रत्येकालाच हे वाक्य म्हणायला आवडेल.... शौक बडी चीज है!


Web Title: Deepika padukones neon sling bag costs more than 1 lakh rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.