​विराट-डी विलियर्समध्ये रंगला फुटबॉल सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 20:35 IST2016-05-01T15:04:03+5:302016-05-01T20:35:41+5:30

क्रिकेटपटू  विराट कोहली आणि एबी डी विलियर्स यांच्यात मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे. काल रॉयल चॅलेंजर्सने सरावादरम्यान फुटबॉलचा सामना खेळला आणि या सामन्यात विराट व विलियर्य दोघेही एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसले.

The colorful football match in Virat-D Villiers | ​विराट-डी विलियर्समध्ये रंगला फुटबॉल सामना

​विराट-डी विलियर्समध्ये रंगला फुटबॉल सामना

आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डी विलियर्स यांच्यात मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे. काल रॉयल चॅलेंजर्सने सरावादरम्यान फुटबॉलचा सामना खेळला आणि या सामन्यात विराट व विलियर्य दोघेही एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसले.  डी विलियर्सने विराटसोबत फुटबॉल खेळत असतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर श्ेअर केला. ‘विराटच्या आजूबाजूला राहण्याची संधी नेहमीच मिळत नाही. माझ्या फुटबॉल करिअरचा हा गौरन्वित करणारा क्षण आहे’ असे त्याने या फोटोखाली लिहिले.
 

It's not every day u get to run around @imVkohli #proud moment in my Football career. Haha


यानंतर विराटनेही हा फोटो रिटिष्ट्वट केला. शिवाय, मी दररोज तुझ्यासोबत राहण्यास तयार आहे, मित्रा...पुढच्यावेळी मी अधिक चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल, असे विराटने लिहिले.
 

Everyday in the office for you buddy. Next time i shall try to be quicker @ABdeVilliers17 

Web Title: The colorful football match in Virat-D Villiers