Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:51 IST2019-05-17T14:49:08+5:302019-05-17T14:51:09+5:30
Cannes फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली आणि आपला क्लासी लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी फॅन्ससोबतच क्रिटिक्सच्या मनाचा ठाव घेतला.

Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?
Cannes फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली आणि आपला क्लासी लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी फॅन्ससोबतच क्रिटिक्सच्या मनाचा ठाव घेतला. दीपिका पादूकोण ने सलग चौथ्या वर्षी Cannesच्या रेड कार्पेटवर वॉक केलं तर कंगनाचं हे दुसरं वर्ष होतं. बॉलिवूड आणी हॉलिवडूमध्ये आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवणाऱ्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने यावर्षी कानमध्ये डेब्यू केला आहे.
सर्वात पहिला लूक पाहूयात कानच्या रेड कार्पेटवर डेब्यू करणाऱ्या प्रियांका चोप्राचा... मेट गाला 2019 मध्ये आपल्या विचित्र लूकमध्ये नेटकऱ्यांची शिकार झालेल्या प्रियंकाचा कान 2019च्या रेड कार्पेटमधील लूक क्लासी आणि हटके होता. प्रियंकाने ब्लॅक अॅन्ड रोज गोल्ड कलरचा कॉर्सेट डिझाइन असलेला ऑफ-शोल्डर हाय स्लिट गाउन वेअर केला होता. प्रियंकाने त्यासोबत क्लासी अक्सेसरीज वेअर केल्या होत्या. कानांमध्ये मोठे-मोठे डँग्लर असणारे इयररिंग्ज वेअर केले होते. यावर प्रियंकाने हेअरस्टाइल मात्र सिम्पल ठेवली होती. तिने केस मोकले सोडले होते. प्रियंकाच्या इतर रेड कार्पेट लूकच्या तुलनेमध्ये तिचा हा लूक फार सिम्पल होता.
बॉलिवूडची क्विन कंगना राणौतने दुसऱ्यांना कानमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. कंगनाने इंडियन टच देण्यासाठी साडी वेअर केली होती. कंगनाने कान 2019मध्ये गोल्डन कलरची कांजीवरम साडी नेसून रेड कार्पेटवर अवतरली होती. त्याचबरोबर गोल्डन कलरचा हेवी वर्क असणारा कॉर्सेट डिजाइन ऑफ शोल्डर ब्लाउज आणि आपल्या लूकला थोडासा वेस्टर्न टच देण्यासाठी पर्पल कलरचा हँन्ड वॉर्मर वेअर केला होता. कंगनाचा हा देसी लूक फारच क्लीसी दिसत होता.
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण सलग चार वर्ष कानमध्ये रेड कार्पटवर वॉक करत आहे. खरं तर दीपिका एखाद्या गिफ्ट ऱ्हॅपप्रमाणे दिसत होती. व्हाइट कलरचा प्लंजिंग नेकलाइन असणारा पफ स्लीव्स आणि हाय स्लिट असणारा लॉन्ग ट्रेल गाउन तिने वेअर केला होता. पण तिच्या व्हाइट गाउनचा हायलाइट होता तो म्हणजे, तिचा ब्लॅक कलरचा मोठा बो. जो तिला एखाद्या गिफ्ट ऱ्हॅपप्रमाणे लूक देत होता. दीपिकाने आपल्या लांबसडक केसांचा हाय पोनीटेल बांधला होता. दीपिकाची रेड कार्पेटवरील फोटज सांगत आहेत की, ती तिचा लूक फार एन्जॉय करत होती.
तुम्हाला काय वाटतं? कोणाचा लूक सर्वात भारी होता....दीपिका, प्रियंका की कंगनामध्ये कोणाचा रेड कार्पेट लूक तुम्हाला सर्वात जास्त आवडला?