हिल्स वेअर करायला कोणाला आवडत नाही? कारण यामुळे तुम्हाला ट्रेन्डी आणि स्टायलिश लूक देतात. परंतु, हिल्समुळे अनेकदा कंबर आणि पायांच्या टाचांना वेदनांचं कारण होतात. जर तुम्ही हिल्स फक्त स्वतःला ट्रेन्डी आणि क्लासी लूक मिळावा म्हणून वेअर करत असाल तर आमचा सल्ला असेल की, तुम्ही हिल्स घालणं सोडून द्या आणि लोफर्स (Loafers) वेअर करायला सुरुवात करा. लोफर्स वेअर केल्यामुळे तुम्ही स्वतःला कंम्फर्टेबल फिल करण्यासोबतच ट्रेन्डीही दिसाल. एवढचं नाही तर हिल्समुळे सहन कराव्या लागणाऱ्या पायांच्या वेदना आणि कंबरदुखीही नाहीशी होईल. 

हिल्सपेक्षा लोफर्स नेहमीच आरामदायी असतात. तसेच हे तुम्हाला सेक्सी आणि स्टायलिश लूक देण्यासाठीही मदत करतील. हल्ली बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये लोफर्स वेअर करण्याचा ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. लोफर्स तुम्ही कोणत्याही प्रकारे स्टाइल करून वेअर करू शकता. तुम्ही हे साडीसोबत टिम-अप करू शकता.

बॉलिवूडचीफॅशनिस्ता सानोम कपूर आहूजानेही लोफर्स साडीसोबत वेअर केले आहेत. तिचा लूक फार क्लासी आणि हटके दिसत होता. फक्त सोनमच नाही तर करिश्मा कपूर, मलायका अरोरा यांसारख्या टॉप अभिनेत्रीही अनेकदा लोफर्समध्ये दिसून येतात. 


 
जर तुम्ही वर्किंग असाल तरिही घाबरण्याची गरज नाही. तसचे वर्कमोड आणि वातवरण पाहून तुम्हाला वेगवेगळे फुटवेअर्स वेअर करण्याची गरज नाही. वोफर्स तुम्ही वर्कप्लेसवरही वेअर करू शकता. कधी-कधी तुम्ही ऑफिसमध्ये कॅज्युअल लूक ट्राय करू शकता आणि त्यासोबत लोफर्स वेअर करू शकता. ऑफिसमध्ये कंम्फर्टेबल असण्यासोबतच तुम्ही ट्रेन्डी दिसाल. 

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु लोफर्स तुम्ही पार्टिमध्येही वेअर करू शकता. खास गोष्ट म्हणजे, हे तुम्ही ड्रेसेसपासून स्कर्टपर्यंत आणि वन पीसपासून साडीसोबतही ट्राय करू शकता. पार्टिमध्येही तुम्ही क्लासी आणि ट्रेन्डी दिसाल. व्हेकेशनसाठी बाहेर जाणार असाल तर तिथेही लोफर्स वेअर करू शकता. तुमच्या सगळ्या आउटफिट्सवर हे मॅच होतात. त्यामुळे दुसरे फुटवेअर्स कॅरी करण्याची गरज भासत नाही. 

Web Title: Bollywood actresses love for loafers do shop for these and have them in your wardrobe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.