.. अन् मॅडोनाला रडू कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:44 IST2016-01-16T01:14:05+5:302016-02-09T11:44:42+5:30

.. अन् मॅडोनाला रडू कोसळले पॅरिसमधील दहशदवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कॉन्सन्र्टमध्ये पॉप दिवा मॅडोनाला अश्रू अनावर झाले.

..and the Madonna broke down | .. अन् मॅडोनाला रडू कोसळले

.. अन् मॅडोनाला रडू कोसळले

रिसमधील दहशदवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कॉन्सन्र्टमध्ये पॉप दिवा मॅडोनाला अश्रू अनावर झाले. इतक्या भयानक हल्ल्याने मी हादरली आहे. काही बोलण्याची माझी मन:स्थिती नाही. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. जे घडले ते मी विसरू शकत नाही. पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला. त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात मी सहभागी आहे. अचानक घडलेल्या या हल्ल्यात जे लोक मारले गेले, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते, असेही तिने म्हटल्याचे तिची मॅनेजर ओसेरीने सांगितले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, एकीकडे माणसं मारली जात असताना, मी इथे कशासाठी डान्स करीत आहे. गीत गात आहे. आपले जवळचे नातलग मारल्याने एकीकडे शोकाकूल झालेल्या माणसे दिसत असताना आम्ही कशासाठी मौजमस्ती करीत आहोत, याकडेही तिने लक्ष वेधले आहे.

Web Title: ..and the Madonna broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.