​अंबानीने दिले हिरानंदानीला मॅरेथॉन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 19:47 IST2016-05-03T14:17:17+5:302016-05-03T19:47:17+5:30

अंबानींनी हिरानंदानींना या महिन्यात होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये पूर्ण अंतर धावण्यासाठी चॅलेंज केले.

Ambani gave Hiranandani Marathon Challenge | ​अंबानीने दिले हिरानंदानीला मॅरेथॉन चॅलेंज

​अंबानीने दिले हिरानंदानीला मॅरेथॉन चॅलेंज

प उद्योगपतींमध्ये नेहमीच व्यावसायिक स्पर्धा असते. परंतु अनिल अंबानी आणि  निरंजन हिरानंदानी यांच्यामध्ये असणाºया एका वेगळ्याच स्पर्धेची चर्चा सध्या कॉर्पोरेटमध्ये ऐकायला मिळत आहे.

नुकतेच एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली आणि अंबानींनी हिरानंदानींना या महिन्यात होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये पूर्ण अंतर धावण्यासाठी चॅलेंज केले.

हिरानंदानी यांनी याचा खुलासा केला की, अनिल आणि माझ्यात ही पैज लागली आहे. परंतु माझ्याकडून तर 10 किमी अंतरदेखील धावले जात नाही. अनिलने मला सांगितले की, मॅरेथॉन पूर्ण करायची असेल तर मला आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करून दहा किलो वजन करण्याची गरज आहे. तर पाहूया काय होते.

पण या पैजेचे बक्षीस काय आहे? जर हिरानंदानी मॅरेथॉन पूर्ण करू शकले नाही तर त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टमधील एक फ्लॅट अंबानींच्या नावे करावा लागणार आहे. आता गंमतीजमतीमध्ये जरी ही शर्यत लगाली असेल तरी तिचा सन्मान करणे तर भाग आहे.

niranjan hiranandani

हिरानंदानी सांगातात, अनिल याबाबत खूप गंभीर आहे. त्याचा रुटिन पाहून तर मला वाटते मी हरणार. त्याच्या प्रमाणे व्यायाम, डाएट करणे माझ्याकडून तरी होत नाही. मी बड्या मुश्किलीने दोन दिवस व्यायाम करून शकलो. मॅरेथॉनचे 21 किमी अंतर पूर्ण करणे खूप आव्हानात्मक आहे.

Web Title: Ambani gave Hiranandani Marathon Challenge