निसर्गाच्या वाढत्या ºहासामुळे कोरोनासारखी अनेक संकटे भविष्यात येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. विकासासाठीचे कुठलेही पाऊल निसर्गाच्या ºहासाकडे घेऊन जाते. तो थांबविणे आता आपल्या हातात नाही. हा ºहास कमीत कमी कसा होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दिपक आपटे यांनी स्पष्ट केले. बीएनएचएसचे संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. पर्यावरण शिक्षण आणि संशोधनात १३७ वर्षांपासून ही संस्था काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आपटे यांच्याशी संवाद साधला.- गजानन दिवाण, उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद.कोरोनाने आम्हाला काय शिकविले?- निसर्गाचा वाढता ºहास पाहता कोरोना हे शेवटचे संकट आहे असे समजता कामा नये. अशी अनेक संकटे येऊ शकतात. त्यासाठी तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणाऱ्या रोगांवर आता अधिक काम करण्याची गरज आहे. शहरी भागातील जैवविविधतेचा अभ्यास करायला हवा. या जैवविविधतेतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. जोर्पंत आपण त्या जीवाला ईजा पोहचवत नाही, तोपर्यंत सर्व ठीक असते. एकमेकांचा हस्तक्षेप वाढला की संघर्ष निर्माण होतो. चंद्रपुरात वाघांच्या बाबतीत तेच होत आहे. हे टाळण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हायला हवा. या जैवविविधतेत होणाºया बदलावर लक्ष ठेवायला हवे. त्याचे परिणाम शोधत राहावे लागणार आहेत. नंतर त्यावरील उपाय याचाही अभ्यास करावा लागेल. अशा प्रश्नाला सामोरे जाणारा भारत हा काही एकमेव देश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील जवळपास सर्वच देश या संकटाचा सामना करीत आहे. आपली स्थिती त्यांच्यापेक्षा वाईट आहे. कारण आपली लोकसंख्या, दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्यांच्या संख्या आणि प्रमुख गरजादेखील पूर्ण होऊ न शकणारी संख्या या पार्श्वभूमीवर इतर देशांच्या तुलनेत आपल्यासमोरील आव्हान अधिक मोठे आहे.यावर उपाय काय?- आता आपण पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे सेंद्रीय शेतीचे चांगले मॉडेल आपण उभे करायला हवे. भारताने अलिकडेच २७ कीटकनाशकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निसर्गाचा ºहास थांबविण्यासाठी असे निर्णय आपल्याला भविष्यात घ्यावे लागतील. सरकारच्या अशा भूमिकेला लोकांनीदेखील सहकार्य केले पाहिजे. जागतिक पातळीवर आपण पर्यटन उभे करू शकू का, याबाबतही विचार व्हायला हवा. हे सर्व करीत असताना संरक्षित क्षेत्र संरक्षित कसे राखले जातील, याचाही विचार करायला हवा. शेवटी मानव-वन्यजीव संघर्ष हा कोणालाच परवडणारा नाही. केवळ संवर्धन करुन भागणार नाही, तर वाढलेल्या जैवविविधतेला कसे सांभाळणार याचेही नियोजन व्हायला हवे.
कोरोनासारखी संकटे येत राहणार; तयार राहणे एवढेच आपल्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 15:39 IST