तिने जायचे कुठे? अनेक शाळांत अजूनही नाही शौचालय! ८ टक्के शाळांत वीज नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:20 IST2025-01-09T15:20:04+5:302025-01-09T15:20:27+5:30
यूडीआयएसई प्लसचा अहवाल

तिने जायचे कुठे? अनेक शाळांत अजूनही नाही शौचालय! ८ टक्के शाळांत वीज नाही!
चंद्रकांत दडस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शाळांमध्ये मुलांना अभ्यासासाठी आनंददायी वातावरण राहावे यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, देशांतील शाळांत अजूनही कोणतीही सुविधा १०० टक्के मिळत नसल्याचे समोर आले आहे. यूडीआयएसई प्लसच्या अहवालानुसार देशातील ५७.२ टक्के शाळांमध्येच कॉम्प्युटर असून ५३.९ टक्के शाळांत इंटरनेट सुविधा आहे. तर देशातील ३ टक्के शाळांत अजूनही मुलींसाठी शौचालय नसल्याचे समोर आले आहे. शाळांत सर्वाधिक ९३.५% स्मार्ट क्लासरूम चंडीगडमध्ये आहेत.
डिजिटल बोर्ड आहेत का?
देशातील केवळ २४.४ टक्के शाळांमध्येच स्मार्ट क्लासरूम असून यात डिजिटल बोर्ड, स्मार्ट बोर्ड, व्हर्च्युअल क्लासरूम किंवा स्मार्ट टीव्ही आहे. यातही २१.२ टक्के सरकारी शाळांमध्येच स्मार्ट क्लासरूम आहेत. खासगी शाळांत हे प्रमाण ३४.६ टक्के इतके आहे. महाराष्ट्रात स्मार्ट क्लासरूमची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक चांगली असून हे प्रमाण ६०.१% इतके आहे.
- ६७.५% - महाराष्ट्रातील शाळांत इंटरनेट सुविधा आहे. सरकारी शाळांत हे प्रमाण ५४.४ टक्के तर खासगी शाळांत ९२.४ टक्के इतके आहे. ५५१ राज्यातील शाळांत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.
- १७.५% - महाराष्ट्रातील शाळांत, चंडीगड (७५.२%), दिल्ली (३३.४%) व हरयाणा (२२.३%) येथे सोलर पॅनेल लावण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत सरासरी ११६४ पुस्तके आहेत.
देशात किती शाळांत पायाभूत सुविधा?