ना IIT ना IIM; छोट्याशा गावातील विद्यार्थीनीने मिळवली Goole मध्ये 56 लाखांची नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:57 IST2023-10-16T15:56:26+5:302023-10-16T15:57:21+5:30
जाणून घ्या एका छोट्याशा गावातून Google पर्यंतचा प्रवास...

ना IIT ना IIM; छोट्याशा गावातील विद्यार्थीनीने मिळवली Goole मध्ये 56 लाखांची नोकरी
Success Story: IIT किंवा IIM मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला Google, MicroSoft सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असते. दरवर्षी या संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनेक मुलांना मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये लाखो रुपये पगाराची नोकरी मिळते. पण, उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या विद्यार्थीनीने IIT-IIM मध्ये न शिकता गुगलमध्ये मोठी नोकरी मिळवली आहे.
उत्तर प्रदेशातील गोठवा गावात राहणाऱ्या आराध्या त्रिपाठीला गुगलने 56 लाख रुपये पगाराची नोकरीची दिली आहे. विशेष म्हणजे, तिने आयआयटी, आयआयएम, एनआयटीसारख्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले नाही. आराध्या त्रिपाठीचे शिक्षण मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठातून (MMMUT) झाले आहे.
आराध्याचे कुटुंबीय सांगतात की, तिला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. सेंट जोसेफ शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने संगणक अभियांत्रिकीमध्ये बीटेक करण्यासाठी MMMUT मध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने तिने स्केलर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून इंटर्नशिप केली.
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर स्केलरने तिला 32 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर केले होते, पण त्याच काळात Google ने तिला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून नोकरी ऑफर केली. आराध्याच्या LinkedIn प्रोफाईलनुसार, तिला React.JS, React Redux, NextJs, TypeScript, NodeJs, MongoDb, ExpressJS आणि SCSS सारख्या अनेक तंत्रज्ञानाची माहिती आणि अनुभव आहे.