'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:17 IST2025-08-22T09:16:50+5:302025-08-22T09:17:38+5:30
पुढील महिन्यापर्यंत आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी आशा विद्यापीठाला आहे.

'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात होऊन दोन महिने उलटल्यानंतरही अद्याप केवळ १०,१६९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या प्रवेशासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यातून पुढील महिन्यापर्यंत आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी आशा विद्यापीठाला आहे.
नोकरी अथवा अन्य कारणांमुळे उच्च शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाईन माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी असते. कोरोनापूर्वी विद्यापीठातील पूर्वीच्या आयडॉलच्या दूरस्थ अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षात या दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या घटली आहे. यंदा २० सप्टेंबरपर्यंत १०,१६९ विद्यार्थ्यांनी सीडीओईच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम.कॉम. (अडव्हान्स अकाउंटन्सी), एम.कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एसी. (गणित) एम.एससी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एससी (संगणकशास्त्र) एमएमएस एमसीए.
या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू
बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी), बी. कॉम. (कॉमर्स, अकाऊटंसी आणि बिझनेस मॅनेजमेंट), बी.कॉम. (अकाऊंट अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान), बीएससी (संगणकशास्त्र)
गेल्यावर्षी २०२४-२५ मध्ये सीडीओईच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांना केवळ १०,४६९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते, तर त्याआधीच्या वर्षी हा आकडा १८,७६० एवढा होता.