व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत मुंबई मागे; पुण्याचे अव्वल स्थान, नाशिक दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:34 IST2026-01-21T14:29:31+5:302026-01-21T14:34:57+5:30

व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या पुण्याच्या तुलनेत कमी असल्याचा मुंबईला फटका

Mumbai lags behind in vocational education entrance exam Pune tops Nashik second | व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत मुंबई मागे; पुण्याचे अव्वल स्थान, नाशिक दुसऱ्या क्रमांकावर

व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत मुंबई मागे; पुण्याचे अव्वल स्थान, नाशिक दुसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात मुंबईचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, विधी, एमबीए आणि बीएड अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १,११,२७० विद्यार्थ्यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नोंदणी केली. त्याखालोखाल नाशिकने दुसरे स्थान पटकाविले असून या जिल्ह्यातून ६६,१०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा मिळून ६५,३८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

शिक्षणाचे मुख्य केंद्र मानली जाणारी मुंबई आता तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर अहिल्यानगर आणि ठाणे हे जिल्हेही मुंबईच्या फार मागे नसून या जिल्ह्यातूनही साधारणपणे मुंबई एवढेच प्रवेश झाले आहेत. या जिल्ह्यातून अनुक्रमे ६४,९३२ आणि ६३६०३ विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे.

मुंबईच्या पिछाडीची कारणे

मुंबईतील विद्यार्थी अजूनही पारंपारिक वाणिज्य आणि वित्त क्षेत्रातील शिक्षणाकडे अधिक आकर्षित होतात. याशिवाय, मुंबईतील अनेक विद्यार्थी आयआयएमसारख्या केंद्रीय संस्था किंवा परदेशातील उच्च शिक्षणाला प्राधान्य देतात.

मुंबईत व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या पुण्याच्या तुलनेत कमी असणे आहे. त्यातच  वास्तव्याच्या खर्चातही मोठी वाढ झाली असून परवडणारे राहिलेले नाही. त्यातून विद्यार्थ्यांचा कल पुण्याकडे वाढल्याचे दिसून येत आहे.

मार्गदर्शन शिबिरे आयोजित

गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि हिंगोली यांसारख्या जिल्ह्यांतून व्यावसायिक शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. सिंदुधुर्गातून ४,४२४, गडचिरोलीतून ६,९४१, रत्नागिरीतून ८,२८५ आणि नंदुरबार येथून ११,०५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावे यासाठी सीईटी सेलने धुळे, अकोला, वर्धा आणि नांदेड येथे १८ ते २२ जानेवारी दरम्यान मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत.

जिल्हापीसीएमपीसीबीएलएलबी ३ वर्षएमबीएबीएडएकूण
पुणे४८,९९९२२,५३७१२,९८१२०,६९४६,०५९१,११,२७०
नाशिक२५,०९२१८,५८२४,३७११०,८६८७,१९२६६,१०५
मुंबई२६,७७५१२,४९११०,२३७१२,०१०३,८७३६५,३८६
अहिल्यानगर२६,१००१९,९५६४,८२९८,९६८५,०७९६४,९३२
ठाणे२७,०८८१३,३८९९,०७९१०,६३९३,४०७६३,६०२

                     




                
 

Web Title : व्यावसायिक शिक्षा प्रवेश परीक्षा में पुणे शीर्ष पर; मुंबई पीछे

Web Summary : व्यावसायिक पाठ्यक्रम प्रवेश पंजीकरण में पुणे सबसे आगे, उसके बाद नाशिक। पारंपरिक क्षेत्रों, विदेश में उच्च शिक्षा और कम कॉलेजों के कारण मुंबई तीसरे स्थान पर है। सीईटी सेल कम पंजीकरण वाले जिलों में मार्गदर्शन शिविर आयोजित करता है।

Web Title : Pune Tops in Professional Education Entrance Exam; Mumbai Trails Behind

Web Summary : Pune leads in professional course entrance registrations, followed by Nashik. Mumbai ranks third due to preference for traditional fields, higher education abroad, and fewer colleges. CET Cell organizes guidance camps in districts with low registrations.