शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

इतना सन्नाटा क्यों है भाई?

By राजा माने | Published: April 16, 2019 4:44 AM

अभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच!

- राजा मानेअभाअपा संघटनेच्या मागणीचा इंद्रदेवांना आदर करावाच लागला, परलोकी ही संघटना तशी पॉवरबाजच! अभाअपा (अर्थात, अखिल भारतीय अजरामर पात्र संघटना) संघटनेचे सदस्यत्व केवळ कला क्षेत्रातील अजरामर पात्रांनाच मिळाले. परलोकीच्या या संघटनेने परग्रहावरील आमीर खान-राजू हिराणीच्या पीकेलासुद्धा संघटनेचे सदस्यत्व नाकारले होते. अशा संघटनेच्या सदस्यांनी भारतभूमीतील निवडणूक दिवाळसणाची पाहणी करण्यास जाण्याची मागणी मान्य होऊ नये, यासाठी नरदांनी भरपूर गेमा केल्या, काड्या केल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट इंद्रदेवांनी अभाअपाची मागणी मान्य केली, पण सोबत गाइड म्हणून झेलेअण्णांना नेण्याचा जीआर काढला आणि अनंत माने यांच्या एक गाव बारा भानगडी, रामदार फुटाणे नानांच्या सामनामुळे झेलेअण्णांचा प्रोफाइल स्ट्राँग होताच, पण बाई वाड्यावर या... या डायलॉगमुळे झेलेअण्णाचा बायोडाटा उठून दिसला अन् इंद्रदेवांनी त्यांना नमो-रागा रण निरीक्षण मंडळाचे गाइड बनविले.मंडळाचे पहिले निरीक्षक ए.के. हंगल ‘शोले’चे इमाम साहेब व झेलेअण्णा मराठीभूमीत दाखल झाले. इमाम साहेब ठार आंधळेच असल्यामुळे त्यांच्या हातातील काठीचे टोक झेलेअण्णांच्या डाव्या हातात होते. अण्णा पुढे आणि इमाम साहेब काठी धरून मागे... मुंबापुरीसह खान्देशाची रपेट सुरू होती. डाव्या हातात काठीचे टोक आणि उजव्या हातात गळ्यात अडकविलेले मोबाइल घेऊन अण्णा इमाम साहेबांना खडान्खडा माहिती देत होते, ऐकवत होते. दिवसभर हा सिलसिला चालूच राहिला. इमाम साहेब मात्र गप्पच होते. त्यांच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता... अखेर वैतागून अण्णाच बोलले, ‘काय राव इमाम साहेब कुछ तो बोलो!’ त्यावर इमाम साहेब बोलते झाले, ‘भाई झेलेअण्णा, इतना सन्नाटा क्यों है भाई...’ हे शब्द कानावर पडताच अण्णा चक्क खेकसलेच ! सन्नाटा? इतना गोंधळ सुनाया अन् तुम बोलताय सन्नाटा! जळगावला वो कमलवालों का मारामारी, सुनाया, गिरीशभाऊ का अ‍ॅक्शन रोल बताया.

उदनयराजेंने निकाले हुए चित्र-विचित्र आवाज सुनाया, वो आझम खान का जयाप्रदा को बोला हुआ अनाब-शनाब बात सुनाया, शायर रामदासजीने रिपब्लिकन ऐक्य के वास्ते मंत्रिपद छोडने का किया हुआ वादा भी सुनाया... फिर भी ऐसे गोंधळ में तुम पूछताय, ‘सन्नाटा क्यों है भाई...’
हा संवाद सुरू असतानाच झेलेअण्णांना एक पक्ष कार्यालय दिसले. काही महिला कार्यकर्त्या कार्यालयातून बाहेर पडत होत्या. त्यांच्याशी संवाद साधावा, म्हणून अण्णांनी त्यांना थांबविले. सवयीप्रमाणे ते बोलते झाले, ‘बाई व्वा...’ (पुढचे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडणार तोच, आता इमाम साहेबांनीच झेलेअण्णांच्या तोंडावर आपला हात दाबून धरला अन् अनर्थ टळला). त्या दोघांना पाहून महिला कार्यकर्त्यांनी नमस्कार केला. काय मदत हवी काय, अशी विचारपूस केली. महिलेचा आवाज कानावर पडताच इमाम साहेब बोलते झाले... कौन बसंती? वो अहमद को समझाती क्यों नही... (आता मात्र झेलअण्णांचा हात इमाम साहेबांचा तोंडावर गेला आणि पुढचा डायलॉग तिथेच थांबला) अखेर अण्णांनी इमाम साहेबांना सन्मानपूर्वक परलोकी धाडले. निरोप घेताना, ते एवढेच म्हणाले, ... आयला इमामसाब, आता रिपोर्ट में सन्नाटा क्यों है भाई , असं मत लिखो..

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी