शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार?

By यदू जोशी | Updated: June 10, 2022 09:25 IST

राजकारण बेभरवशाचा खेळ आहे. जीभ दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच दातांनी चावली जात असते. भरवशाच्या म्हशीला टोणगं तर नाही होणार?

- यदु जोशी(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)

राज्यसभेची शुक्रवारी होणारी निवडणूक आणि २० जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणूक ही उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य ठरवेल. या दोन्ही निवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी झाली तर सरकारला पुढची अडीच वर्षे कुठलाही धोका नसेल. भाजपच्या सर्व इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले जाईल; पण चमत्कार झाला तर सरकार निश्चितपणे अडचणीत येईल.  ठाकरे यांच्यासाठी १० जून आणि २० जूनला कठीण पेपर आहेत. बारावीचा निकाल तर ९५ टक्के लागला; पण  निवडणुकीच्या पेपरात आऊट ऑफ मार्क मिळविण्याचा आत्मविश्वास शिवसेनेला आहे. दुसरीकडे राज्यसभेला तिसरा अन् विधान परिषदेला सहावा उमेदवार देऊन देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय आयुष्यातील आजवरची सर्वात मोठी खेळी खेळत आहेत. त्यात ते जिंकले तर त्यांच्या बंगल्याचा पत्ता बदलू शकतो. हरले तर सागरात तळमळत राहतील.

समाजवादी पार्टी, बच्चू कडूंचे दोन आमदार, लहान-मोठे पक्ष, अपक्षांचे १३ आमदार महाविकास आघाडीच्या खेम्यात दिसत आहेत, समर्थनाचा आकडा वाढत चालला आहे; पण राजकारण बेभरवशाचा खेळ आहे. जीभ दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच दातांनी चावली जात असते. भरवसा तुटण्याचा आवाज येत नसतो; पण जखम खोल होते. भरवशाच्या म्हशीला टोणगं तर नाही होणार? अनिल देशमुख, नवाब मलिकांना कोर्टाने मतदानाचा हक्क नाकारल्यानं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. शुक्रवारी हायकोर्टात काय होते, ते पाहायचे!एकनाथ शिंदे, अनिल परब या बिनीच्या शिलेदारांनी ‘अर्थ’पूर्ण तजवीज केल्याचं सांगितलं जात आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणं दोन्हीकडून घेतली जात आहेत म्हणतात.  निकालापर्यंत सगळ्यांची धाकधूक राहील. महाविकास आघाडीचं राज्यसभेचं गणित बिघडलं तर विधान परिषदेत पोळा फुटेल. कारण १० तारखेचा पेपर खुला आहे अन् २० तारखेची परीक्षा गुप्त मतदानाची आहे. प्रत्येक जण विचारत आहे की भाजपचं गणित काय आहे? कशाच्या भरवशावर त्यांनी तिसरा अन् सहावा (व छुपा सातवा) गडी उतरवला आहे? आकड्यांचा सध्याचा खेळ महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे अन् चमत्काराची शक्यता भाजपच्या बाजूनं. 

आकडे जिंकतील की चमत्कार? लढाई आर या पारची आहे. तिसरी जागा जिंकण्याचं प्रेशर दिल्लीहून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर आहे. गोवा जिंकलं म्हणून फडणवीस हिरो झाले, उद्याच्या दोन्ही निवडणुका जिंकून दाखवल्या तर ते सुपर हिरो होतील. दुसरीकडे महाविकास आघाडीनं बाजी मारली तर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक काँग्रेस आरामात जिंकेल. उद्धव ठाकरेंची मांड आणखी पक्की होईल.

राज्यसभा महाविकास आघाडीच जिंकेल; पण विधान परिषदेत मोठा दगाफटका होईल, असाही तर्क दिला जात आहे. दाखवून मतदान करायचं असल्यानं मोठ्या पक्षांच्या आमदारांची मत फुटणार नाहीत, या भ्रमात कोणी राहू नका. भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.  ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदार थांबले आहेत, त्यांच्या भिंतीना कान असतील तर कळेल. भाजपचं सॉफ्ट टार्गेट काँग्रेस राहू शकते. फास्ट धावण्याच्या नादात भाजपचा ट्रॅक सुटू नये एवढंच. पहाटेचा शपथविधी फसला होता, त्याला अडीच वर्षे झाली. आताचा प्रयोग फसला तर विरोधी बाकावर ‘फेविकॉल का जोड’ लावून बसावं लागेल. परीक्षा फक्त ठाकरेंचीच नाही फडणवीसांचीदेखील आहे.

देसाईंना फटका कशाचा? सुभाष देसाई यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली. मातोश्रीवरील त्यांच्या वजनाचा टक्का संजय राऊत यांनी खाल्लेला दिसतो. देसाईंचं योगदान मोठं आहे. मातोश्रीशी निष्ठा हा त्यांचा गुण.  बारामतीत पाऊस पडला म्हणजे ते गोरेगावात छत्री उघडत नाहीत. मातोश्रीवर पाऊस पडला अन् जगात कुठेही असले तरी त्यांना भिजल्यासारखं होतं. आता ते सल्लागार मंडळात जाताहेत. त्यांना संधी देऊन मंत्रिपद टिकवलं तर तरुण आमदारांमधून नाराजीचे सूर उमटतील की एकट्या देसाईंचेच लाड का म्हणून? रावते, रामदास कदमांना तोच न्याय का नाही, असे प्रश्न विचारले गेले असते म्हणून त्यांचा पत्ता कट केला असेल कदाचित.  शिवसेनेत नव्यांना संधी तरी मिळते; पण राष्ट्रवादीचं काय? वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणाऱ्या मंत्र्यांबाबत राष्ट्रवादीच्या तरुणच नाही तर पन्नाशी पार केलेल्या आमदारांमध्येही खदखद आहे. त्यांच्या घडाळ्यातील  नाराजीचा अलार्म साहेबांना ऐकू जात नाही.

पंकजाताईंची गडबड काय झाली? भाजपनं पंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं म्हणून खूप चर्चा झाली; पण नेमकी माशी कुठं शिंकली? भाजपचे काही नेते आता असं बोलत आहेत की मला विधान परिषदेत घेणार असाल तर विरोधी पक्षनेतेपददेखील द्या, अशी पंकजाताईंची अट होती. ती वर मान्य झाली नाही. मोदी-शहांच्या राजकारणात अशा अटीबिटी चालत नाहीत, हे पंकजाताईंना चांगलंच ठाऊक असणार. त्यामुळे त्यांनी अटफट टाकली असेल, असं नाही वाटत. पंकजाताईंनी तरी विधान परिषदेवर का जावं? त्यांचा दरवाजा विधानसभेचा आहे. मागचा दरवाजा कशासाठी? लोकनेत्यानं विधान परिषदेवर जाण्यासाठी त्या खडसे थोडेच आहेत? अमिताभनं अमिताभच राहिलं पाहिजे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस