शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

नफेखोर पीक विमा कंपन्यांच्या खिशात कधी हात घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:04 IST

र्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही.

शिवाजी पवार - उपसंपादक, लोकमत अहमदनगर

राज्यात ऐन काढणीला आलेली खरिपातील पिके अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसलेला आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. पीक विम्यातून काहीतरी भरपाई मिळेल ही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र ती कितपत सत्यात उतरेल याबद्दल शंका आहे. कारण पूर्वानुभव! पंतप्रधान पीक विमा योजना यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. शेतातील पिकांना अवकाळी पाऊस, गारपीट, पूर तसेच इतर नैैसर्गिक आपत्तीतून काही नुकसानभरपाई मिळावी म्हणून आणली गेलेली ही योजना. मात्र योजना कंपन्यांसाठी राबवली जाते की शेतकऱ्यांसाठी, हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. विम्याचा हप्ता भरण्यापासून तर नुकसानीपोटी विम्याचे पैैसे पदरात मिळेपर्यंत शेतकऱ्याला मोठी वणवण करावी लागते.

सर्वप्रथम पीक विमा घ्यायचा म्हटला तर कंपनी निवडण्याचा कोणताही मूलभूत अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. जीवन विमा, वाहनाचा विमा, संपत्तीचा विमा यांत कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना असते. पीक विम्यात मात्र शेतकऱ्याला ग्राहक म्हणून कंपनी निवडण्याचे अधिकार नाहीत. कृषी विभाग प्रत्येक जिल्ह्याकरिता एका कंपनीची नियुक्ती करतो. कंपनी मिळाली म्हणजे प्रश्न सुटला असे नाही. तर येथूनच शेतकऱ्याचा काट्याकुट्याचा प्रवास सुरू होतो. जोखीम स्तराच्या ३३ टक्के रकमेएवढा विम्याचा हप्ता असतो. त्याकरिता खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी या हप्त्याचा अनुक्रमे दोन, दीड व पाच टक्के भार शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित हप्त्याचा भार राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी पन्नास टक्के उचलते. नैसर्गिक आपत्ती तर शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलीच असते. मात्र पिकाचे नुकसान कोणत्या टप्प्यावर झाले यावरच नुकसानभरपाईची रक्कम ठरते. पीक काढणीला आले होते की फुलोऱ्यात?- हे महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा पंचनामे करून तपासते. नुकसानीचे मोजमाप हे मंडलनिहाय होते. म्हणजेच एखाद्या गावामध्ये अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांना विमा मिळेल याची खात्री नाही. कारण ते गाव ज्या महसुली मंडलात येते, त्या मंडलाची एकूण पावसाची सरासरी त्यासाठी गृहीत धरण्यात येते. येथेच खरी मेख आहे. संपूर्ण हंगाम उलटला तरी पीक विमा कंपनी ही जिल्हा, तालुका आणि मंडल स्तरावर कोठेही कार्यालय थाटत नाही. कंपनीने कोण प्रतिनिधी नेमले आहेत, याची शेवटपर्यंत उकल होत नाही. कार्यालय नाही म्हणजे फोनही नाही. मग झालेल्या नुकसानीसाठी संपर्क साधायचा कोठे आणि दाद मागायची कोठे, असा पेच निर्माण होतो.पी. साईनाथ यांनी पीक विमा योजना हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात परभणी जिल्ह्याची आकडेवारी मांडली. सन २०१७ मध्ये तेथे अडीच लाख शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन वाया गेले. त्यांना विमा कंपनीने नुकसानीचे ३० कोटी रुपये मंजूर केले. मात्र त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून विमा हप्त्याचे १७३ कोटी रुपये कंपनीकडे भरले होते. त्यामुळे कंपनीने एकाच जिल्ह्यात एका पिकातून १४३ कोटी रुपये कमाविल्याचे पी. साईनाथ सांगतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील युती सरकारमध्ये पीक विमा योजनेवर हल्लाबोल चढवला होता. निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेत पीक विमा गाजला. आताही अतिवृष्टीने महाराष्ट्र झोडपला आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्वच नेते नुकसानीचा आढावा घेत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पीक विम्याच्या प्रश्नाने राज्यभर प्रचाराचा फुफाटा उडवला तो विषय आता चर्चेतही नाही. सरकार पीक विम्याला शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकाराचा दर्जा देणार का? मंडलांऐवजी शेतकरीनिहाय नुकसानीचे पंचनामे करणार का? विमा कंपनी निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना कधी मिळेल? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. अतिशय तुटपुंज्या रकमेत येणारे पर्जन्यमापक यंत्रदेखील प्रत्येक गावात बसविले जाऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो तर दुसरे कोरडे राहते अशी परिस्थिती आहे. गाव आणि मंडलांच्या सीमारेषा पाहून पाऊस पडत नाही. तरीही एका मंडलामध्ये दोन तीन गावे मिळून पाऊस मोजला जातो. किमान पक्षी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांना जरी आदेश दिले तरीही मापके बसविणे सहजसाध्य होईल. त्यातून नैैसर्गिक आपत्तीचे खरेखुरे चित्र मुंबईत बसणाऱ्या यंत्रणेला मिळेल. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा