शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

संजय राऊतांच्या सुटकेनंतर आता काय होईल? अदृश्य हातांनी मदत केली असेल!..खरं-खोटं काय ते कळेलच!

By यदू जोशी | Updated: November 11, 2022 07:57 IST

राष्ट्रवादीचे नेते ‘आतच’ असताना राऊत कसे बाहेर आले ? - काही संशयात्मे म्हणतात, अदृश्य हातांनी मदत केली असेल!.. खरं-खोटं काय ते कळेलच !

यदु जोशीसहयोगी संपादक,लोकमत

राष्ट्रवादीचे नेते ‘आतच’ असताना राऊत कसे बाहेर आले ? - काही संशयात्मे म्हणतात, अदृश्य हातांनी मदत केली असेल!.. खरं-खोटं काय ते कळेलच!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पदयात्रेच्या निमित्ताने तयार करीत असलेला माहोल आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका या दोन घटनांनंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे असेल, याबाबत आता उत्सुकता आहे. राहुल यांना जनसामान्यांचा मिळत असलेला मोठा  प्रतिसाद आणि राऊत यांचे बाहेर येऊन डरकाळी फोडणे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडत असल्याने भाजप-शिंदे सेनेला कुठेतरी काहीतरी धडधड होतच असेल. राऊत यांची तोफ सुरू झाली आहे. तुरुंगात १०० दिवस पूर्ण करून राऊत बाहेर आले आहेत. कैदेतले एकाकी क्षण आत्मचिंतन करायला लावतात.

राऊत यांनीही ते केलेच असेल; त्यातून त्यांची कुठली भूमिका तयार झाली, ते कळेलच. एकदा तुरुंगात गेल्यावर माणसं अधिक  बेडर होतात किंवा खचतात.  राऊत  अधिक निडर झाले असण्याचीच शक्यता अधिक! त्यातच त्यांची अटक बेकायदा होती, असे ताशेरे न्यायालयाने ओढणे, ही बाब ठाकरे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे. पुढच्या काळात त्याचे भांडवल होत राहील. ठाकरे-शिंदे, ठाकरे-भाजप संघर्ष टोकाला जाऊ शकतो. काही नवीन चौकशा रडारवर येऊ शकतात. अनिल देशमुख, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते आतच आहेत; पण राऊत बाहेर आले, यात काही लोक राजकारण शोधत आहेत. कोणाचं, कुठे, काही बोलणं झालं असेल, अदृश्य हातांनी मदत केली असेल वगैरे लोक म्हणतात; खरं-खोटं त्या अदृश्य हातांनाच माहिती! काही अटी-शर्ती होत्या का? हेही काही दिवसांतच कळेल. राऊत पूर्वीसारखेच भाजप, शिंदेंवर तुटून पडले तर समजायचं की वैसा कुछ भी नही था! भाजपच्या कोणत्या नेत्यांवर ते तुटून पडतात, यालाही वेगळे संदर्भ असतीलच.

जनसंपर्काचा नवा ट्रेंडकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्याच्या टोकावरून पुढच्या आठवड्यात मध्य  प्रदेशात जाईल. त्यांनी तयार केलेलं वातावरण टिकवून वाढवण्यात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते किती यशस्वी होतात, ते पाहायचं. राहुल यांनी या पदयात्रेच्या निमित्ताने स्वत:ला निर्विवादपणे  प्रस्थापित केलं आहे. त्यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीतील विजय हा पुढचा टप्पा असेल. तो टप्पा २०२४ मध्ये किंवा २०२९ मध्येही येईल कदाचित. तोवर संयम राखण्याची काँग्रेसच्या नेत्यांची किती तयारी आहे, यावर बरंच काही अवलंबून असेल.  राहुल गांधी हे आबालवृद्धांना छातीशी कवटाळत ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिसळत आहेत; ते पाहता कपड्यांची इस्री न मोडणारे सर्वपक्षीय नेते ‘सोचने पे मजबूर’ झाले आहेत. राहुल यांच्याकडे आज देण्यासारखं काही नाही; पण ते विश्वास देत आहेत... आणि लोकांना तोच हवा आहे!

हा तर विरोधाभास !राहुल सामान्यांमध्ये मिसळत असताना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालय सामान्यांना दुपारी ३ पर्यंत बंद करण्यात आलं आहे. अर्थात दोष लोकांचाही आहे, मुख्यमंत्री कार्यालयात घुसायचं, अधिकारी केबिनमध्ये नसताना त्यांच्याकडील फायली धुंडाळायच्या, असे  प्रकार छुटपुट नेते, कार्यकर्त्यांकडून घडत होते. त्यामुळे नाईलाजाने दरवाजे बंद  करावे लागले. मात्र, गर्दीचं योग्य नियोजन करण्याचा पर्याय वापरता आला असता.  मी कुणालाही, कुठेही, कधीही भेटतो, असं मुख्यमंत्री शिंदे सांगतात आणि तसे वागतातदेखील. मुख्यमंत्री आरोग्य कक्षातून काही मिनिटांत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या रुग्णांना तत्काळ मदत दिली जाते. अशा लोकमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे दरवाजे दुपारी ३ पर्यंत सामान्यांसाठी बंद ठेवणं हा विरोधाभास आहे. अधिकाऱ्यांना लोक तसेही नकोच असतात. मंत्रालयात २ ते ४ या वेळेत लोकांना भेटणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सत्कार केला पाहिजे. ते स्वत: रात्री ११ पर्यंत मंत्रालयात असतात!

शिंदेंचे बडबोले सैनिकअब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संतोष बांगर, शहाजीबापू पाटील हे ढाल-तलवारीतली तलवार तोडायला पुरेसे आहेत. राज्यातले उद्योग बाहेर पाठविण्यापेक्षा यांना कुठेतरी पाठवा. आमदार, नेते जितके जास्त बरळतील तितकी त्यांची विश्वासार्हता कमी होईल आणि भाजपवरील त्यांचे अवलंबित्व वाढत जाईल. भाजपला तर तेच हवं आहे.  शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे हा त्याचाच एक भाग आहे. आपणच आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन केली तर चांगल्या प्रतिमेच्या शोधात भाजपच्या कुशीत जाण्याशिवाय शिंदेंच्या आमदारांना पर्याय नसेल. ढाल-तलवारीची जागा कमळ घेईल. शिंदे गटाला त्यांची प्रतिमा सांभाळावी लागेल. भाजपने शिंदेंशी युती केली आहे, प्रतिमेशी नाही. बडबोल्या लोकांचं महत्त्व वाढतं, तेव्हा अधोगती नक्की असते. या लोकांना आवर घातला जाईल का? 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत