शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उद्योगावर काय परिणाम होईल?

By admin | Updated: August 5, 2016 04:36 IST

भारतातील वाहन उद्योग सध्या दोन पद्धतीने वाहन विक्री करतो.

भारतातील वाहन उद्योग सध्या दोन पद्धतीने वाहन विक्री करतो. त्यानुसार करही वेगवेगळे भरावे लागतात. पहिल्या पद्धतीत वाहन उत्पादक कंपन्या थेट डीलरला वाहने पाठवितात. अशा वेळी कंपन्यांना ठरावीक दराने केंद्रीय आणि राज्य सरकारांचा कर (सीएसटी) द्यावा लागतो. दुसऱ्या प्रकारात उत्पादक ठरावीक राज्यांतील वखारीत वाहने पाठवितात. तेथून ती वितरकांकडे जातात. अशा परिस्थितीत उत्पादकांना व्हॅट द्यावा लागतो. हे दोन्ही कर अंतिमत: वाहनाच्या किमतीत समाविष्ट होऊन ग्राहकांकडूनच वसूल केले जातात. या करांची जागा जीएसटी घेईल. जीएसटी डेस्टिनेशन बेस्ड कर आहे. वाहने पाठविण्याच्या वेळीच हा कर उत्पादकांना भरावा लागेल. जीएसटी कसा वसूल करायचा याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता आलेली नाही. सध्याच्या करव्यवस्थेतून जीएसटीमध्ये जातानाच्या संक्रमण काळात काही प्रश्नांची सोडवणूक करावी लागणार आहे. विक्री किमतीवर जीएसटी लावला जाणार असेल, तर तो कोणत्या तारखेला विकला गेला याला महत्त्व राहील. जीएसटी कसा लावायचा यावरून आगामी काळात उद्योग आणि सरकार यांच्यात झटापट होऊ शकते. संक्रमण काळात सध्याच्या कर सवलतींबाबत मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उदा. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी कर सवलती देणाऱ्या राज्यांत हजारो कोटींची गुंतवणूक केलेली आहे.जीएसटीमध्ये ही कर सवलत पुढे सुरू राहील की, बंद होईल, हे स्पष्ट झालेले नाही. कर सवलत बंद करण्याचा निर्णय झाल्यास वादळ उठू शकते. विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (सेझ) बाबतीत हा प्रश्न जास्त गंभीर होईल. मागास भागांच्या विकासासाठी अनेक राज्यांनी उद्योगांना कर सवलती दिल्या. अशा भागांत मोठ्या प्रमाणात सेझची निर्मिती झाली आहे. कर सवलती बंद झाल्यास सेझचे अस्तित्वच संपेल.सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) अशा अनेक मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. केळकर समितीने सुचविल्याप्रमाणे सर्व अप्रत्यक्ष कर जीएसटीमध्ये विसर्जित करण्यात यावेत, जुन्या वाहनांचा बाजारही जीएसटीमध्ये आणण्यात यावा. जीएसटीशिवाय इतर कोणताही छुपा कर लावण्यात येऊ नये, अशा काही मागण्या सियामने नोंदविल्या आहेत. जीएसटीमुळे आंतरराज्यीय व्यवसाय अधिक सोपा होणार आहे.