शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला इंग्रजी कळत नव्हतं, पोरांना मराठी येत नाही!-हिशेब तिथेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 04:54 IST

आपल्या बबड्याला खाडखाड इंग्रजी यायलाच पाह्यजे, या आकांक्षेने पछाडलेल्यांची भूक ओळखलेल्यांनी गावाेगावी इंग्रजी स्कूलं उभी केली.

बालाजी सुतार, कवी-कथाकार

एका आडवळणी गावाला जायचं म्हणून मोटारसायकल हाकत होतो. एकेरी सडक. मधूनमधून लागणारी बारकी गावं. एकेठिकाणी सडकेलगत ‘न्यू ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल’ अशी भरदार अक्षरं असलेली पाटी दिसली. शंभरेक पावलांवर, चहूबाजूंनी पत्रे मारलेले आणि छतही पत्र्याचंच अशा चार-सहा वर्गखोल्यांची शाळा. समोर वीतभर अंगण. त्यात रोवलेली ध्वजविरहित उंच काठी. आसमंतात सगळीकडे पसरलेली रुक्षकोरडी उन्हेरी मराठवाडी छटा... न्यू ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल! नाव वाचून आश्चर्य वाटलं नाही.  मागच्या दीड-दोन दशकांपासून असल्या शाळा गावागावात दिसायलालागल्या आहेत. या शाळा बघताना मला गावातली आमची शाळा आठवते. उतरतं छत असलेली मोठी आयताकृती शाळा. दोन-तीन खोल्या ऑफिस, स्टाफरूम वगैरेत गुंतलेल्या आणि बाकीच्यांतून भरणारे वर्ग. चौकोनाच्या मधल्या मोठ्या रिकाम्या जागेत काही झाडं. एक फार प्राचीन चाफ्याचं, एक तुतीचं. त्याला आमच्या गावात सैतुलाचं झाड म्हणत. एक-दोन झाडं तर डाळिंबाची. पावसाळ्यात या झाडांच्या बुंध्याखाली चहाच्या रंगाचं पाणी दिसे आणि एरवी कोणत्याही दिवसात त्या हिरव्या पानांत पाखरं चिवचिवत असत. 

धोतर-सदरा-टोपी अशा पेहरावातले, खेडवळ दिसले तरी चांगलंच शिकवणारे आमचे गुरुजीलोक. इंग्रजी आणि गणित हे  विषय पोरांना अवघड जात, पण ते सर्व संबंधितांनी गृहीतच धरलेलं. दहावीच्या परीक्षेत बहुसंख्य पोरं या दोन विषयांत आपटी खात. गणितं निदान सूत्रं कळायला लागल्यावर जमायची. इंग्रजीबद्दल असं नव्हतं. ती भाषा गावात ना कुठे कानी पडायची, ना दिसायची, त्यामुळे तिच्याशी मैत्री अशक्य आणि शत्रूभाव जास्त असे.  

असंख्य पोरं दहावीच्या परीक्षेत इंग्रजीत नापास होऊन शाळेला रामराम ठोकायची आणि जमेल त्या कामधंद्याला लागायची. इंग्रजीची भयंकर धास्ती खाल्लेली हीच आमची पिढी आता मजबूत फिया भरून आपल्या पोरांना गावगन्ना उगवलेल्या या ‘न्यू ऑक्सफर्ड’ स्कूलांमध्ये पाठवते. 

‘इंग्रजी येत नसल्यामुळे आपलं काहीच नीट झालं नाही’ असा खोल गंड मनात कायम बाळगून असलेल्या आम्हा बापांमुळे इंग्रजी शाळांच्या बाजारपेठांना कमालीची तेजी आलेली आहे. याचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे मराठी शाळा क्रमश: बंद पडणं. त्यात सरकारी अनास्थेचा भाग मोठा आहेच, पण आपल्या बबड्याला खाडखाड इंग्रजी यायलाच पाह्यजे, या आकांक्षेने पछाडलेल्या लोकांचाही यात सिंहाचा वाटा आहे. लोकांची ही भूक ओळखलेल्या व्यापाऱ्यांनी आणि अनेक नेते-पुढाऱ्यांनी मग गावागावातून इंग्रजी स्कूलं उभी करून मजबूत पैसा छापायला सुरुवात केली.

दोनेक दशकांचा काळ सरला आहे. युनिफॉर्म घातलेली, खिशाला शाळेच्या नावाचा इंग्रजी बिल्ला लावलेली आणि टायबंद असलेली कथितपणे स्मार्ट दिसणारी मुलं आता घरोघर दिसतात. एकदा बाहेरून कुठून तरी घराकडे आलो, तर गल्लीत बरीचशी माणसं स्तब्धपणे उभी असलेली दिसली. कुणाचंसं निधन झालेलं होतं. शेजारचा एक इंग्रजी शाळेत जाणारा मुलगा दिसला, त्याला विचारलं, कोण गेलं? दोनपाच सेकंद विचार करत तो म्हणाला, ‘ते तिकडं खडं दिसतंय नं, त्याचे चुलत वडील ऑफ झालेत.’ ‘चुलत वडील’ हे नातं लक्षात यायला मला मिनिटभर वेळ लागला. चुलत्याला मराठीत नेमकं काय म्हणतात हे त्या इंग्रजी शाळेतल्या मुलाला माहीत नव्हतं.

आम्हाला इंग्रजी कळत नव्हतं. आमच्या पोरांना मराठी कळत नाही. म्हणजे एकूणात हिशेब जिथल्या तिथेच आहे.    majhegaane@gmail.com 

English
हिंदी सारांश
Web Title : English eluded us; Marathi escapes kids: accounts stay the same!

Web Summary : Generations struggle with language. Parents, fearing their own English shortcomings, push children to English schools, neglecting Marathi. Kids lose touch with their roots, leaving the linguistic equation unchanged.
टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीStudentविद्यार्थी