काठ्या पडल्या, डोस्की फुटली, आता ‘सातबारा’ सोपा होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:49 AM2020-09-09T00:49:23+5:302020-09-09T00:49:29+5:30

जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कायदेशीर शासकीय अभिलेख म्हणजे ‘सात-बारा’. हा उतारा जमिनीची ओळख व जमिनीचा आरसा

The sticks fell, the doski burst, now 'Satbara' will be easier! | काठ्या पडल्या, डोस्की फुटली, आता ‘सातबारा’ सोपा होणार!

काठ्या पडल्या, डोस्की फुटली, आता ‘सातबारा’ सोपा होणार!

googlenewsNext

तलाठ्याच्या चावडीत मिळणाऱ्या वितभर लांबीच्या सातबाºयाच्या कागदी तुकड्याचे महत्त्व ज्यांनी बांधावरचे तंटे अनुभवले ते चांगले जाणतात. सातबारा संपला की आपले जीवनच संपले असे बळीराजा मानतो. हा सातबारा मिळविण्यासाठी तासन्तास तलाठी चावडीपर्यंत खेटे मारत अनेकांनी आपल्या वहाणा झिजविल्या तर काहींनी सातबाºयासाठी खूनखराबाही केला. या सातबाºयाची कहाणी १९९७च्या अहमदनगर मराठी साहित्य संमेलनात टी.एन. परदेशी या कवीने मांडली होती.

सातबारापायी नंबरा-नंबरात जुपली
कुणाचा बांध सरकला, कुणी वाट अडवली
काठ्या पडल्या, डोस्की फुटली
कधी कचाकच कुºहाडी घुसल्या
धावून गेला जामीनकीलाही सातबारा
शेतकºयाच्या उशाला-पायथ्याला अन् शेतकºयाचे अगदी अंथरूण-पांघरूणदेखील सातबारा असतो हे या कवीने सांगितले. सातबाºयाचा कागदी तुकडा हातावर पडला म्हणजे तलाठी भाऊसाहेबांनी आपल्यावर मेहेरबानी केली अशीच शेतकºयाची भावना असे. अर्थात जिंदगी गेली तरी अनेक शेतकऱ्यांना सातबाºयावरील उभे, आडवे रकाने समजले नाहीत. असा हा ‘रहस्यमयी’ सातबारा आता सुलभ होतो आहे ही महसूल क्षेत्रातील क्रांतीच म्हटली पाहिजे.

जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कायदेशीर शासकीय अभिलेख म्हणजे ‘सात-बारा’. हा उतारा जमिनीची ओळख व जमिनीचा आरसा. तलाठ्याकडे २१ प्रकारचे गाव नमुने असतात. त्यापैकी सातबाºयात ‘सात’ आणि ‘बारा’ असे दोन नमुने समाविष्ट असतात. ‘सात’ या नमुन्यात जमिनीचा मालक, त्याचे एकूण क्षेत्र, लागवडीलायक क्षेत्र व खराबा, जमिनीवर इतर कुणाचा हक्क आहे का? जमिनीवर कर्ज आहे का? याचा तपशील असतो. नमुना ‘बारा’मध्ये जमिनीत कोणत्या हंगामात कोणते पीक व घटक पीक घेतले, पाण्याची सुविधा काय? याची माहिती असते. या दोन्ही नोंदी म्हणजे सातबारा. या नोंदींना कायद्याच्या भाषेत खूप महत्त्व असते. जमीनमालक काय सांगतो त्यापेक्षा सातबाºयात काय लिहिलेले आहे त्याला कायद्याने महत्त्व असते.

सातबाºयात बदल का होत आहेत?

पूर्वी तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तलाठी रजिस्टरमधील नोंदी पाहून एका छापील सातबारा नमुन्यात वरील सर्व तपशील हस्ताक्षराने लिहित. लिखापढीची ही प्रक्रिया वेळखाऊ होतीच; पण भाऊसाहेबांच्या अक्षराचे फराटे ओळखताना नाकात दम येई. त्यात ‘ध’चा ‘मा’ होऊन अनेक घोळ झाले. त्यामुळे शासनाने प्रथम या उताºयांचे २०१५ साली संगणकीकरण केले, नंतर तो आॅनलाइन केला. आता २ सप्टेंबरला त्यात आणखी बारा प्रकारच्या सुधारणा करुन तो सुलभ केला आहे.
ब्रिटिशकाळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी महसूल मॅन्युअल तयार केले. त्यात १९४१मध्ये सुधारणा झाल्या. त्यानंतर आठ दशकांनंतर नवीन महसुली लेखांकन येत असून, सातबाºयात सुधारणा होत असल्याचा महसूल विभागाचा दावा आहे. जगात कोठेही घरबसल्या १५ रुपयांवर आता तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा मिळेल.

नवीन बदल कोणते असतील?
नवीन सातबाºयावर वरच्या बाजूला शासनाचा लोगो व महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क असेल.
गावाच्या नावासोबत एक कोडनंबरही असेल.
लागवडीलायक व पोटखराबा क्षेत्राची एकत्रित बेरीजही आता दिली जाईल.
पूर्वीच्या सातबाºयात मयत खातेदार, क्षेत्र विक्री केलेले खातेदार, इतर हक्कातील कमी केलेले कर्ज या नोंदी कंसात असत. आता या नोंदी कंसात असतीलच; पण त्यावर आडवी रेघ मारून खोडल्या जातील.
पूर्वीच्या सातबाºयात खातेक्रमांक हा इतर हक्क रकान्यात होता. आता मालकाच्या नावासोबतच असेल.
जमिनीचे मालक एकापेक्षा अधिक असतील तर दोघांच्याही नावात आडवी डॉटेड रेघ मारली जाईल.
शेती व बिनशेती क्षेत्रासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील उतारे असतील.
बिनशेती उताºयात पिकाबद्दलची माहिती नसेल.
शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर व बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर एकक दाखवले जाईल.
प्रलंबित फेरफार उताºयावरच दिसतील. नवे व जुने फेरफार, तसेच जमिनीत शेवटचा फेरफार कधी झाला तो क्रमांक व तारीखही उताºयावर नमूद असेल.

Web Title: The sticks fell, the doski burst, now 'Satbara' will be easier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.