शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमुक नाही, तमुकही नाही ? नाहीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 06:53 IST

१४ सप्टेंबरपासून इराणची राजधानी तेहरान संतप्त महिला आणि पुरुषांच्या ‘हिजाब’विरुद्धच्या आंदोलनामुळे धगधगत आहे.

१४ सप्टेंबरपासून इराणची राजधानी तेहरान संतप्त महिला आणि पुरुषांच्या ‘हिजाब’विरुद्धच्या आंदोलनामुळे धगधगत आहे. २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीने हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईअंतर्गत तिचा मृत्यू झाला आणि आंदोलन पेटले. अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांवर असलेल्या निर्बंधांबाबत जगभरातून चिंता आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे; पण महिलांवरील निर्बंध ही बाब फक्त इराणपुरतीच मर्यादित नाही. जगभरात सर्वत्र कुठल्या ना कुठल्या कारणासाठी महिलांवर निर्बंध लादले जातात. कुठे या निर्बंधांविरुद्ध स्त्रिया आवाज उठवत आहेत, कुठे महिलांच्या विरोधाच्या आवाजाला पुरुषही बळ देत आहेत तर कुठे अजूनही आपल्यावरील निर्बंधांविरुद्ध ब्र काढण्याचा अधिकारही महिलांना नाही. 

१.  महिलांवरील कडक  निर्बंधाबाबत पश्चिम आशियातील सुदान, येमेन यानंतर कतार देशाचा नंबर लागतो.  पालकांच्या परवानगीशिवाय येथील मुली परदेशात शिकायला जाऊ शकत नाही.  लग्न झालेल्या महिला बाहेरील देशात एकट्याने प्रवास करू शकतात; पण नवऱ्याला वाटल्यास तो त्यावर हरकत घेऊ शकतो आणि अशा हरकतीला तिथे कायदेशीर मान्यता आहे. पुरुष सोबत असल्याशिवाय  ३० वर्षांखालील एकट्या महिलेला हाॅटेलमध्ये राहाण्यास परवानगी नसते.  कतारमध्ये महिलांना आपल्या मुलांसदर्भातील आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा कोणत्याच कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येत नाही. मुलांच्या पालकत्वाबाबत महिलांना कायदेशीर अधिकार नाहीत.२. रशियात काम करण्याच्या बाबतीत ‘नो वुमन जाॅब्स’ लिस्ट अजूनही मोठी आहे. पूर्वी ४५६ नोकऱ्यांमध्ये महिलांना परवानगी नव्हती. आता हा आकडा कमी  झाला तरी आजही ९८ क्षेत्रांत महिलांना प्रवेश नाही.  विमान चालवणे, खाणकाम, वेल्डिंग काम, अग्निशमन विभाग...  इत्यादी. महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ नये या कारणाने महिलांना  नोकरी करण्यास मनाई करण्यात आली आहे.३. अनेक अरब देशांमध्ये  बाहेर वावरताना महिलांवर ‘अबाया’ घालण्याचे बंधन आहे. तेथील महिला डाॅक्टरांना पुरुष रुग्णांवर उपचार करण्यास मनाई आहे. महिलांना घराबाहेर पडताना घरातील पुरुषांची परवानगी आवश्यक असते.४.  अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. महिलांना सरकारी , खाजगी क्षेत्रात काम करण्यास मनाई आहे. महिलांसाठी असलेल्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास महिलांना मृत्यूदंडही दिला जातो.५. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर असलेल्या लाॅक्सुमाव्हे या शहरात महिलांनी गाडीवर दोन्ही बाजुंनी पाय  टाकून बसण्यास मनाई आहे. तसेच पुरुषांच्या मागे  गाडीवर बसताना आधारासाठी पुरुषाच्या शरीरावर हात ठेवण्यास  महिलांना कायदेशीर मनाई आहे. ६.  इस्त्रायलमध्ये  महिलांना नवऱ्याला घटस्फोट द्यायचा असेल तर त्यासाठी नवऱ्याची परवानगी अनिवार्य आहे. एकटी महिला अत्याचाराला कंटाळून घटस्फोटाचा दावा दाखल करू शकत नाही.७. येमेनी न्यायालयासमोर महिला अर्ध व्यक्ती मानली जाते. त्यामुळे न्यायालयात एका महिलेची साक्ष ग्राह्य धरली जात नाही. दोन महिलांची साक्ष ही एका पुरुषाच्या साक्षीएवढी मोजली जाते.८. अमेरिकेतल्या १४ राज्यात गर्भपातावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. प्रगत राष्ट्रात महिलांना आपल्या शरीरावर असलेला अधिकार अशा प्रकारे नाकारण्यात आला आहे. अमेरिकेतील ७ राज्यांमध्ये बलात्कार करणाऱ्या पुरुषाला बलात्कारातून जन्माला आलेल्या अपत्याच्या पालकत्वाचा अधिकार देण्यात आला आहे.९.  इक्वाटोरिएल ज्युनिआ, गॅम्बिया, सौदी अरेबिया, सोमालिया, दक्षिण सुदान, येमेन या सहा देशांमध्ये मुलींची किती कमी वयात लग्न करावीत यावर काहीही मर्यादा नाही. मुलींना अनिच्छेने शाळा सोडावी लागते. त्यांना घरगुती हिंसाचार आणि आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.१०. जगभरात केवळ चार देशांमध्ये विवाहातंर्गत बलात्कार गुन्हा मानला गेला आहे. सिंगापूरसह ११२ देशात विवाहांतर्गत बलात्काराला कायदेशीर मान्यता आहे.

खरी ‘समानता’ फक्त १२ देशांत!स्टॅटिस्टा या आंतरराष्ट्रीय डेटाबेस कंपनीच्या सांख्यिकी अहवालानुसार बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, आइसलॅड, लक्झमबर्ग, पोर्तुगाल, स्पेन आणि स्वीडन या सारख्या काही देशांतच स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आहेत. शिक्षण, नोकरी, वेतन, लग्न, मुलांचे संगोपन, पालकत्व, व्यावसायिक मालकी, मालमत्ता- संपत्ती व्यवस्थापन, पेन्शन य सर्व बाबतीत कायदेशीरदृष्ट्या स्त्री- पुरुष भेद केला जात नाही.

टॅग्स :Iranइराण