शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दुर्जन विचारांनी सज्जनशक्तीचे अपहरण करू नये म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:08 IST

सज्जन लोकांच्या विचारांचा पराभव करण्याचा हातखंडा राजमार्ग म्हणजे त्यांचे दैवतीकरण करणे. विचारांचा जागर, त्या अनुषंगाने कृती जास्त महत्त्वाची !

- डॉ. हमीद दाभोलकर(मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस)

११ एप्रिल रोजी सुरू झालेले महात्मा जोतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष आणि १४ एप्रिल रोजी झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती आपण नुकतीच साजरी केली. त्यांच्या युगप्रवर्तक विचारांचा जागर करण्याबरोबरच या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे  दैवतीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली दिसते.. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चांगुलपणाला ज्यांनी अत्यंत कष्टपूर्वक सज्जनशक्तीमध्ये रूपांतरित केले अशा या  दोन महान व्यक्ती ! त्यांना माणूस म्हणून आठवणे, त्यांच्या विचारांचा जागर करणे, त्या अनुषंगाने कृती करणे या गोष्टींना आपण अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि त्यांचे विचार कृतीत उतरवण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न केले पाहिजे, इतरांना त्याकरता उद्युक्त केले पाहिजे. प्रतिमांची मिरवणूक, जल्लोष यामागची भावना प्रामाणिक असली, तरी त्यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. 

सज्जन लोकांच्या विचारांचा पराभव करण्याचा एक शतकानुशतके चालत आलेला राजमार्ग म्हणजे त्यांचे दैवतीकरण करणे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये या सज्जनशक्तीचा पराभव करण्यासाठी विरोधकांची फारशी गरज पडत नाही ! याचे कारण एकदा का आपण त्यांचे दैवतीकरण सुरू केले की, त्यांच्यासारखे वागण्याची आपली जबाबदारी झटकून टाकायला आपण मोकळे होतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अगदी गाडगेबाबांपर्यंत अनेक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वांनी आपल्या देशाला आकार दिला. त्यांचे स्मरण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांशी असलेली आपली बांधिलकी कायम आहे ना याचे भान सतत जागते ठेवणे. 

दैवतीकरण टाळूनदेखील आपल्या या अत्यंत कर्तृत्ववान पूर्वसुरींची आठवण कशी अखंड राखता येऊ शकेल? - त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. असे मार्ग अनेकांनी शोधले आहेत. प्रागतिक विचारांच्या अनेक व्यक्ती आणि संघटना त्यांच्या पातळीवर हे प्रयत्न करत असतात. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर पुस्तकांचे स्टॉल लावून कोट्यवधी रुपयांची पुस्तक विक्री केली जाते. सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावून जोतिबा फुले यांची आठवण काढणे किंवा ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोळा-सोळा तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचे त्याप्रमाणे सलग अभ्यास करण्याची स्पर्धा अशा स्वरूपाचे अनेक उपक्रम करता येऊ शकतात.

सोलापूर शहरात डीजेमुक्त आंबेडकर जयंतीचा केलेला उपक्रमदेखील अत्यंत अनुकरणीय म्हणावा असा आहे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणात व्यक्तिपूजेविषयी अतिशय कठोर इशारा दिला आहे. राजकारणात व्यक्तिपूजा शेवटी हुकूमशाहीकडे घेऊन जाते एवढेच सांगून ते थांबत नाहीत तर ते असेदेखील सांगतात की, ‘कृतज्ञता बाळगण्यात काहीही गैर नाही, पण ती स्वातंत्र्याच्या किमतीवर नसावी’. दैवतीकरणाच्या मार्गे कोणी सज्जनशक्तीचे अपहरण करू नये अशी जर आपली प्रामाणिक इच्छा असेल तर आपण बाबासाहेबांनी दिलेला हा इशारा अजिबात विसरता कामा नये.    hamid.dabholkar@gmail.com

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र