शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत पैसा आहे, सुधारणा नाही

By admin | Updated: August 4, 2016 05:27 IST

शिर्डी संस्थानवरील नियुक्तीसाठी साईभक्त असण्यापेक्षा तुम्ही सत्ताधारी पक्षाचे भक्त आहात का, हा निकष जास्त महत्त्वाचा बनला आहे

शिर्डी संस्थानवरील नियुक्तीसाठी साईभक्त असण्यापेक्षा तुम्ही सत्ताधारी पक्षाचे भक्त आहात का, हा निकष जास्त महत्त्वाचा बनला आहे. याही सरकारने विश्वस्त मंडळ नेमताना हाच निकष लावला. या राजकीय साठमारीत शिर्डीचा विकास खोळंबला आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पावणेदोन वर्षानंतर सवड मिळाली. पण, एखाद्या महामंडळावरील राजकीय नियुक्त्या जाहीर कराव्यात, तसाच प्रकार याही मुख्यमंत्र्यांनी शिर्डीबाबत केला. आपली देवस्थानेदेखील राजकारणाचाच भाग झाली असल्याचे त्यांनीही दाखवून दिले. १७पैकी जे १२ सदस्य सरकारने घोषित केले, ते बहुतेक राजकीय चेहरेच आहेत. म्हणजे त्यांच्या मूळ पात्रतेपेक्षा लोक त्यांना राजकारणी म्हणून अधिक ओळखतात. या बहुतेकांची मूळ पात्रता जाणून घ्यायची असेल तर त्यांचा शैक्षणिक ‘बायोडाटा’ वाचून मगच ते समजेल. भाजपाने संस्थानचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे आपल्याकडे घेतल्याने शिवसेना नाराज झाली आहे. नगर जिल्ह्यातून पाच जणांचा विश्वस्त मंडळात समावेश झाला. हे सर्व भाजपाशी संबंधित आहेत. दुसरीकडे स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे यांचा विश्वस्त मंडळात समावेश नसल्याने त्यांचेही समर्थक नाराज आहेत. विखेंचा समावेश करावा यासाठी गावोगावी बंद, धरणे, आंदोलने सुरु आहेत. शिर्डी संस्थान १९२२ साली स्थापन झाले. पूर्वी धर्मादाय आयुक्त संस्थानचा कारभार पाहात असत. २००४ साली हे संस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आले. तेव्हापासून सरकार विश्वस्त मंडळ ठरवते. या नियुक्त्यांसाठी निकष ठरलेले आहेत. पहिली बाब म्हणजे विश्वस्त हा साईबाबांचा भक्त असावा. दुसरी बाब विश्वस्त पदासाठीची व्यक्ती ही विधी, व्यवस्थापन, लोकप्रशासन, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण विकास आदी क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ असावी. अर्थात हे झाले कागदोपत्री निकष. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जशी राजकारण्यांचीच वर्णी लागते, तसेच आता शिर्डी संस्थानबाबत घडत आहे. सार्इंचे भक्त असण्यापेक्षा तुम्ही सत्ताधारी पक्षाचे भक्त आहात का, हा निकष जास्त महत्त्वाचा आहे. कॉंग्रेसच्या राजवटीतही हेच होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विश्वस्तपदी राजकीय व्यक्तींच्याच नियुक्त्या केल्याने न्यायालयाने विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते. आताही न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. यावेळीही न्यायालयाने स्थगिती दिली तर, संस्थानचा कारभार ठप्प पडेल. शिर्डी संस्थानकडे आजमितीला पंधराशे कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. गत वर्षाचे या देवस्थानचे उत्पन्न ४३१ कोटी होते. परंतु, एवढ्या श्रीमंत देवस्थानमध्ये आज दर्शन बारीसारखी नीट सुविधा नाही. भाविकांचे स्वागत कचऱ्याने होते. पाण्याअभावी संस्थानची भक्त निवासस्थाने उन्हाळ्यात बंद ठेवावी लागली. साईदर्शन सोडले तर गावात दुसरे काही बघण्यासारखे नाही. त्यामुळे भाविकांचे येथे थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. शेगाव येथील गजानन महाराज देवस्थानने मोठे उद्यान उभारले. स्वच्छता जपली, सेवेकरी तयार केले. तसे शिर्डीत काहीही घडले नाही. नवनियुक्त अध्यक्ष सुरेश हावरे मूळचे विज्ञानातील संशोधक व नंतर बांधकाम व्यावसायिक आहेत. आपण शिर्डीत लेझर शो, लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो अशा काही सुविधा निर्माण करु, असे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पण, त्यांना काम करु दिले जाणार का, हा मुद्दा आहे. शिर्डी ही नॉलेज सिटी म्हणून विकसित करता येईल, असे शरद पवार म्हणाले होते. देशात अन्यत्र नसतील असे आधुनिक अभ्यासक्रम येथे सुरु करण्याचा त्यांचा मानस होता. यासाठी त्यांनी तज्ज्ञांची समितीही नेमली. पण, पुढे काहीच झाले नाही. शिर्डीत साधे वरिष्ठ महाविद्यालय नाही. पैसा असतानाही शिर्डी का सुधारत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. नव्या विश्वस्तांना व लोकप्रतिनिधींनाही हा विचार करावा लागेल. - सुधीर लंके