‘युद्धस्य कथा रम्य’ हे मिथक आहे. दुसऱ्या महायुद्धात बॉम्बहल्ल्यात पोळलेला ब्रिटन, नाझी फौजांचा निप्पात करण्याकरिता हाराकिरी केलेला रशिया किंवा अणुबाँबच्या हल्ल्यात बेचिराक झालेला जपान आणि आता कोरोना युद्धात होरपळलेले कुणीही हे मान्य करणार नाही. ...
राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा येण्याचा झराच थांबला आहे. महसूल किंवा विविध प्रकारचे कर गोळा होण्याची संपूर्ण साखळीच बंद पडली आहे. वेतनात कपात करीत असताना खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
विज्ञानाच्या तसेच वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीची घोडदौड करूनही माणूस कोरोनाच्या अतिसूक्ष्म विषाणूपुढे किती हतबल आहे, हेच या महामारीने दाखवून दिले आहे. ...
भविष्यकाळाची पावले ओळखून बचावात्मक खबरदारी, महामारीसदृश फैलावाचा सामना करण्यासाठी कामी येईल अशी प्रभावी उपचारप्रणाली व नव्या उत्पत्तीचा वेध घेण्यासाठीचे संशोधन, अशा तिहेरी आघाड्यांवर काम करावे लागणार आहे. ...