शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

आता बोलणे दुरावले कायमचे, पण स्वर असतीलच तार्इंचे...

By admin | Updated: April 5, 2017 05:21 IST

प्रतिभावंत गायिका असलेल्या किशोरीतार्इंशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध होते, माझी मोठी बहीणच होती ती

प्रतिभावंत गायिका असलेल्या किशोरीतार्इंशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध होते, माझी मोठी बहीणच होती ती! आता तिचे नसणे सहन करणे आले. या काहिलीत दिलासा एवढाच की, त्यांचे स्वर असतील सोबतीला... त्या केवळ गायिकाच नव्हत्या. संगीताविषयीच्या चिंतनातून नव्या पिढीसमोर वस्तुपाठ घालून देणाऱ्या ‘विचारवंत’ होत्या त्या! संगीतात भावपूर्ण गायकी खूप महत्त्वाची असते, त्याचा संपूर्ण अभ्यास त्यांच्या गायकीत पाहायला मिळतो.आवाजाला तयार कसे करावे, लगाव कसा वाढवावा, स्वर कसा लावावा, असे गायकीशी संबंधित अभ्यासपूर्ण चिंतन, त्याला विचारांची असलेली जोड, अशा मांडणीतून गायनाचे सादरीकरण करणारे गायक फार दुर्मीळ. त्यातल्या एक किशोरीताई. त्या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका, पण घराण्यांमधल्या भिंती त्यांना अडवून धरू शकल्या नाहीत. आमच्या डागर घराण्याविषयी त्यांच्या मनात नितांत प्रेम होते. माझी सत्तरी झाली, तेव्हा मुंबईतल्या सत्कार सोहळ्याला त्या आवर्जून आल्या. ‘भाई’ म्हणून खूप आशीर्वाद दिले त्यांनी. सारख्या भेटी होत. बोलणे होई... आता तो योग नाही. पण तरी ‘भेटतीलच’ त्या. भेटत राहातील... - सईदुद्दीन डागर , ज्येष्ठ धृपद गायकदैवी देणगी किशोरीताई गेल्या, यावर विश्वास बसत नाही. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीला कार्यक्रम केला होता. मी त्यांना फोन केला होता, त्या वेळी १४ आॅक्टोबरला त्यांनी कार्यक्रम करण्यासाठी मला होकार दिला होता आणि आज ही बातमी आली. त्यामुळे किशोरीताई गेल्या, यावर विश्वास तरी कसा ठेवणार, आकस्मिक घटना आहे. १९५७ साली किशोरीतार्इंना जोधपूर येथे मी पहिल्यांदा भेटलो. त्या वेळी रेडिओचा एक कार्यक्रम होता. त्यानंतर, आमचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. आम्ही अनेक कार्यक्रमांत भेटायचो. त्या म्हणजे देवाची देणगी होत्या. असे कलाकार खूप कमी जन्माला येतात. त्या नेहमी स्वत:च्या अटींवर जगल्या. कधीही त्यांनी तडजोड केली नाही. किशोरीताई जयपूर घराण्याच्या गायिका होत्या, पण त्यांचा विचार वेगळा होता. त्यांनी स्वत:चा एक वेगळा मार्ग निवडला असल्याने त्या तशा जगल्या. हेच विचार त्यांच्या आयुष्याचे तत्वज्ञान होते. पुढच्या पिढीला त्यांच्यासारखी गायिकी ऐकायला मिळणार नाही. - पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ संतूरवादक