शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षविराम आणि सहानुभूती हेच यापुढील पर्याय

By admin | Updated: January 22, 2016 02:39 IST

मागील वर्षी एफटीटीआयमधील निदर्शने जेव्हा जोरात चालू होती तेव्हा एका ज्येष्ठ मंत्र्याने मला फोन करून असे सांगितले होते की, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांना माध्यमातून जास्त

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)मागील वर्षी एफटीटीआयमधील निदर्शने जेव्हा जोरात चालू होती तेव्हा एका ज्येष्ठ मंत्र्याने मला फोन करून असे सांगितले होते की, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांना माध्यमातून जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यांचे म्हणणे होते की, हे विद्यार्थी नक्षल समर्थक आहेत, कृपया त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. मी जेव्हा त्यांना असे विचारले की, असे काय घडले आहे की हे विद्यार्थी तुम्हाला नक्षलवादाशी सहानुभूती ठेवणारे वाटत आहेत. तेव्हा त्यांचे उत्तर होते की, हे विद्यार्थी जे चित्रपट करू पहात आहेत ते सर्व सरकार विरोधात आणि राष्ट्रविरोधी आहेत.राष्ट्रविरोधी हा आरोप लावणे तर आता विविध रंगांच्या कागदांच्या चिरोट्या उधळण्यासारखे सहज झाले आहे, ते दूरचित्रवाहिन्यांच्या स्टुडियोत, निवडणूक प्रचारात आणि महाविद्यालयांच्या आवारात सहज उधळल्या जात आहेत. एनजीओपासून ते पत्रकारांपर्यंत तसेच बुद्धिवादी आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांवर राष्ट्रविरोधी असल्याचा हा आरोप लावला जात आहे. यातून ते आणि आपण असा भेद निर्माण केला जात आहे. हाच आरोप लावत हैदराबाद सेन्ट्रल विद्यापीठातील रोहित वेमुला आणि त्याच्या सहकारी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते, विद्यापीठ आवारातून बाहेर काढण्यात आले होते आणि सुविधांचा लाभ घेण्यापासून रोखण्यात आले होते. याच कारणांमुळे त्याने आत्महत्त्या केली असावी हा प्रश्नच आहे; पण या प्रकरणामुळे जातीची ओळख आणि विद्यार्थी संघटनांमधील राजकारण यांच्यातले उपद्रवी संबंध उघड झाले आहेत. नेमक्या शब्दात म्हणायचे झाले तर उग्र सुधारणावादी दलित राजकारणामुळे विद्यापीठातील उच्चपदस्थांसमोर आव्हान उभे केले गेले आहे किंवा ज्या लोकांची मते आस्थापनेच्या मतांशी जुळत नाहीत त्यांना राष्ट्रविरोधी ठरवले जात आहे का?रोहितच्या फेसबुकवरील सर्व पोस्टवर नजर टाकली तर असे दिसते की, त्याचा राजकारणातील मुख्य प्रवाहांच्या कार्यक्रमांना तीव्र विरोध होता. तो आंबेडकर स्टुडण्ट्स असोसिएशनचा (एएसए) सदस्य होता. तो आणि त्याचे सहकारी हिंदुत्व विचारसरणीचे कडवे टीकाकार होते, त्यांना विवेकानंदांचे विचार बिलकुल मान्य नव्हते. ते डाव्यांना दुटप्पी मताचे तर भाजपा आणि कॉँग्रेसला उच्चजातीय ब्राह्मणी हुकुमशहा मानत. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या फाशीचा निषेध केला होता, फाशी म्हणजे उच्चवर्णीय सत्ताधाऱ्यांच्या श्रेष्ठता सिद्ध करण्याचे साधन आहे, असे त्यांचे मत होते. ते उदारमतवादी आणि सनातन मतांना आव्हान करणारे होते, जसे डॉ. आंबेडकरांनी कित्येक वर्ष आधी जातीय उतरंडीसमोर आव्हान उभे केले होते. त्याच त्यांच्या सुधारणावादी विचारांचा सामना करणे हे एक वेळ ठीक होते; पण त्यांच्या अतिरेकी दृष्टिकोनामुळे त्यांना राष्ट्रविरोधी ठरविण्यात आले का? इतके की त्यांना निलंबित करून विद्यापीठाच्या बाहेर काढण्यात आले. ते काही इतके गुंड होते का की त्यांच्या विरोधकांशी हिंसाचार करणार होते किंवा ते संघ परिवारातल्या प्रस्थापित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसमोर आव्हान उभे करत होते का? हा इतका महत्त्वाचा राजकीय संदर्भ होता का की केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यापीठाकडून या संदर्भात सातत्याने अहवाल मागवत होते? उपकुलगुरुंवर इतका कोणता अतिमहत्त्वाच्या लोकांकडून दबाव आला होता की त्यांना आणि कार्यकारी परिषदेला आधीचा निर्णय मागे घेत त्यांचे निलंबन करावे लागले होते? यात संस्थागत भेदभावाचा अभिनिवेश तर नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त मुक्त, सखोल आणि स्वतंत्र चौकशीनंतरच समोर येतील. या प्रश्नातून सामाजिक दोषसुद्धा समोर येतील ज्यात मतभेदासाठी असलेली जागा संकुचित होत असलेली दिसेल. विवादास्पद विषयावर प्रश्न उभा करणाऱ्यावर सोशल मीडियावर घृणास्पद आरोप करणे हे अपवादात्मक नाही. सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीला समर्थन न देणाऱ्या बुद्धिवाद्यांना हिणवले जाते तर निषेधासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या नागरी समाजाला अराजकतेचे संकेत मानले जात आहे. शैक्षणिक क्षेत्र ही लोकशाहीशी संबंधित वाद-प्रतिवाद आणि विचारांची जागा असली पाहिजे ती दिवसेंदिवस अतिसंवेदनशील आणि विरोधी मतांच्या बहिष्काराची जागा होत चालली आहे. गेल्या दशकभरात हैदराबाद विद्यापीठात आठ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या केली आहे, यातून या विद्यापीठातील सामाजिक विदारण उठून दिसते. मागील वर्षी आयआयटी मद्रासने आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर बंदी घातली होती, त्यांच्यावर पंतप्रधान मोदी आणि हिंदू धर्मीयांविरु द्ध प्रचार करण्याचा आरोप होता. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या बंदीसाठी भर दिला होता, ज्यांनी आधी या विषयावर हितसंबंधी लोकांशी चर्चा केली होती. दुसऱ्या बाजूला राम मंदिर मुद्द्यावर दिल्ली विद्यापीठात परिषद घेण्याचा प्रयत्न झाला होता ज्याला भाजपा विरोधी गटांनी विरोध केला होता. त्यांच्या मते ही परिषद म्हणजे विद्यार्थी वर्गात जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न होता. राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील स्वातंत्र्याच्या बाबतीतला प्रश्न कॉँग्रेसच्या सत्ताकाळातसुद्धा उभा राहिला होता. इंदिरा गांधींच्या हुकुमशाही विरोधातील निदर्शने विद्यापीठातूनच चालू झाली होती. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे आंदोलन किंवा मंडल आयोगाच्या अहवालानंतर, म्हणजे १९८९ नंतर झालेले आरक्षण आंदोलन आठवत असेल बहुतेकांना. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांवरसुद्धा पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यात सत्तेसाठी हिंसा केल्याचा आरोप आहे. आणि आता भाजपा केंद्रात सत्तेत आल्यावर वैचारिक संघर्ष तीव्र होत चालल्याचे दिसत आहे आणि त्यात युवा वर्गावर पकड मिळवण्याची स्पर्धासुद्धा वाढलेली दिसत आहे. हिंदुत्ववादी राजकारणाला नेहमीच दलितांचा उल्लेख करताना अस्वस्थता जाणवली आहे, जरी त्यांनी नजीकच्या काळात दलित नेत्यांना जवळ करण्याचे प्रयत्न केले आहेत. संघ परिवारातील संघटनांवर या दलित नेत्यांनीही नेहमीच उच्च-जातीय राजकारणाचे पुरस्कर्ते म्हणून टीका केली आहे. एएसए या विद्यार्थी संघटनेच्या मतांमध्ये याच विचारांचे प्रतिबिंब आहे, त्याचमुळे ते विरोधात्मक राजकारण करत असतात. त्यांच्याशी निरोगी संवाद साधण्याऐवजी सरकारी निधीवर चालणाऱ्या या शैक्षणिक संस्था त्यांना राष्ट्रविरोधी ठरवत आहेत. यासाठी रोहितची शोकांतिका उदाहरण देता येईल. संघर्ष विराम आणि सहानुभूती हेच आता पुढचे पर्याय आहेत. ताजा कलम : रोहितने त्याच्या हृदयविदारक मृत्यू पूर्व पत्रात असे म्हटले आहे की ‘माझा अंत्यविधी शांततेत करा, असे समजा की मी तुमच्यातच आहे. असे समजा की मी जिवंत राहून नाही तर मृत्यूनंतर आनंदी आहे’. पण जेव्हा नेते मंडळी हैदराबाद विद्यापीठाला भेट देतील तेव्हा रोहितचा मृत्यू हा ज्वलंत मुद्दा होईल. त्यावर दलितांच्या मनांवर राजकीय संघर्ष निर्माण केला जाईल आणि सर्वात शेवटी मतांचे राजकारणसुद्धा केले जाईल.