शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तळकोकणातली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:27 IST

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राजकीय नेत्यांच्या यशाचा तळ दिसू लागला की, सामान्य माणसालाही चिंता वाटू लागते. एकेकाळी झंझावात निर्माण करणारे नेते अखेरच्या लढाईत कोणती खेळी खेळणार याचा अंदाज येत असला तरी त्यात बळ दिसत नाही. अशीच काहीशी अवस्था झालेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांची (शरद पवार आणि नारायण राणे) तळकोकणात कणकवलीत भेट झाली. ती राजकीय स्वरूपाची नव्हती, असे सांगण्यात आले. सदिच्छाभेट असेल, असे मानायला काहीच हरकत नाही. राजकीय नेत्यांची गणिते सदिच्छा भेटीवर आखली जात नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. येत्या चार महिन्यांत देशभरात लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी प्रशासकीय पाातळीवर जशी वेगाने चालू आहे तशी राजकीय नेत्यांनीही आता वेळापत्रक निश्चित करायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सातारा ते कोल्हापूर आणि कोकण असा पंधरवड्यात दोनदा दौरा केला. सातारा आणि कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांच्या उमेदवारीस पक्षातूनच विरोध होत आहे. तो शमविण्यात त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. या खासदारांना आवर्जून भेटून ते संकेत देत आहेत. तसाच संकेत नारायण राणे यांना देऊन तळकोकणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची संपत गेलेली ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ही भेट नसेल कशावरून? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताच सिंधुदुर्गमध्ये शिवसेना संपली होती. या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसच होता; मात्र पक्षाच्या नेत्यांच्या भांडणात राष्ट्रवादी मागे पडली. नारायण राणे यांची तर जाम गोची झाली आहे. भाजपाने त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी कारवाईचा बडगा दाखविला. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्याचे गाजरही दाखविले. त्यामुळे नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध करताच त्यांचा प्रवेशही लांबला तसेच मंत्रिमंडळातही सहभागी होता आले नाही. स्वत:चा पक्ष काढून सोय करून घ्यावी लागली. निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेनेचा विरोध काही संपेना आणि आता तर भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिल्याचा लाभ घेत स्वपक्षाचा नारा देणेच त्यांच्या हाती उरले आहे. राष्ट्रवादीलादेखील तळकोकणात कोणी ताकद देईल, असा नेता उरला नाही. गुहागर आणि दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या वाटेवर अशा बातम्या वारंवार येत राहतात. ते खरेच गेले तर तळकोकणात राष्ट्रवादी तळ पाहणार आहे. अशा कठीण प्रसंगी मदतीला येऊ शकते ती नारायण राणे यांची फौज. शरद पवार आणि राणे या दोघांची गरज आहे याच समउद्देशाने ही ‘सदिच्छा’ भेट नसेल कशावरून? शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा तीच ते करणार असतात, असे अनेकवेळा घडले आहे. त्यामुळे त्यांनी उभयतांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे सांगितले असले तरी त्यातून अनेक अर्थ ध्वनिप्रतित होतात. शरद पवार यांच्यापेक्षा नारायण राणे यांना कोणीतरी हात देण्याची गरज आहे. त्यांचे चिरंजीव आजही कागदोपत्री कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना पक्ष सोडून द्यावा लागणार आहे. शिवसेनेचा विरोध मोडून काढता येणार नाही. कारण भाजपाची अगतिकता आहे. कोकणात तर फारच महत्त्वाची साथ शिवसेनेची राहणार आहे. अशावेळी भाजपाने हात वर केले तर मदत कोण करणार? याच उद्देशाने ते (राणे) सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान पक्षातर्फे जनसंपर्कात गुंतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्ष बळकट करण्यासाठी हा जिल्हा दौरा सुरू आहे. शिवसेना सोडली, कॉँग्रेस सोडावी लागली आणि भाजपामध्ये जाता येईना अशी अडथळ्यांची शर्यत राणे यांना पार करावी लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा छोटा असला तरी येथेच त्यांच्या राजकीय ऊर्जेचा स्रोत आहे. तोच आटला तर दिवा विझायला वेळ लागणार नाही, यासाठीच ही तळकोकणातली गळाभेट असणार आहे.