शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

आजचा अग्रलेख - तालिबानचे 'मोस्ट वाँटेड' मिनिस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 05:10 IST

अफगाणिस्तान दुष्काळ व उपासमारीने तडफडत असताना दहशतवादाच्या मुद्द्यावर मानवी विकास योजनांचा निधी संयुक्त राष्ट्रसंघाकडून थांबविला जातो; पण बामियानमधील बाैद्ध मूर्तींचे जतन करण्यासाठी मात्र युनेस्को पैसे देते

ठळक मुद्देतालिबानचे नवे अफगाण सरकार इस्लामी अमिरात म्हणून ओळखले जाईल. पंतप्रधान या सर्वोच्च पदासाठी अगदी सुरुवातीपासून मुल्ला अब्दुल घनी बरादर यांचे नाव चर्चेत होते; पण आश्चर्यकारकरीत्या हसन अखुंद यांचे नाव जाहीर झाले

एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आजचे क्रांतिकारी, आंदोलक, स्वातंत्र्यसैनिक उद्याचे सत्ताधारी असतात, यात नवे असे काही नाही; पण संपूर्ण जगाने कित्येक वर्षे ज्यांची अतिरेकी, दहशतवादी म्हणून निर्भर्त्सना केली ते सशस्त्र टोळ्यांचे सदस्य नंतर सत्तेवर येतील, मंत्री बनतील, अशी कुणी कल्पना केली नसेल. अफगाणिस्तानातीलतालिबानी राजवटीने तेही करून दाखविले. काबूल जिंकल्यानंतर बावीस दिवसांनंतर तालिबान्यांनी राष्ट्रीय सरकारची घोषणा केली. मुळात तालिबान ही जगाच्या लेखी मोठी दहशतवादी संघटना असल्याने पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद यांच्यासह तेहतीस जणांच्या या मंत्रिमंडळातील बहुतेक सगळे साहजिकच कालचे दहशतवादी आहेत. अमेरिकेच्या एफबीआयसह जगभरातल्या तपास यंत्रणांच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेले अनेक दहशतवादी आता अफगाणिस्तानचे मान्यवर मंत्री बनले आहेत. पाकिस्तानात पाळेमुळे असलेल्या व दहशतवादी कारवायांनी जगाला धडकी भरविणाऱ्या हक्कानी नेटवर्कचे दोघेजण मंत्रिमंडळात आहेत. ज्याच्या शोधासाठी अमेरिकेने ५० लाख डाॅलर्सचे इनाम ठेवले होते तो सिराजुद्दीन हक्कानी आता त्या देशाचा इंटेरिअर मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री आहे.

तालिबानचे नवे अफगाण सरकार इस्लामी अमिरात म्हणून ओळखले जाईल. पंतप्रधान या सर्वोच्च पदासाठी अगदी सुरुवातीपासून मुल्ला अब्दुल घनी बरादर यांचे नाव चर्चेत होते; पण आश्चर्यकारकरीत्या हसन अखुंद यांचे नाव जाहीर झाले. त्याचे कारण, तालिबान्यांमध्येही टोकाचे अंतर्गत मतभेद आहेत. मुळात हा अनेक टाेळ्यांचा समूह आहे. त्यात बंदुका व स्टेनगन घेऊन मैदानात लढणारे आणि कुराणाच्या आधारे शरीयानुसार समाजरचना व्हावी यासाठी धर्मोपदेश करणारे अशा दोन फळ्या आहेत. बरादर हे पहिल्या, तर अखुंद हे दुसऱ्या फळीचे प्रतिनिधी. हक्कानी नेटवर्कला बरादर सर्वोच्च पदावर नको होते; पण त्यांच्या तोडीचे कुणी त्या गटात नसल्याने तडजोड म्हणून मुल्ला हसन अखुंद यांचे नाव ठरले. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरच्या नेतृत्वात तालिबानने सोव्हिएट आक्रमणाविरुद्ध १९९० च्या दशकात मोठी लढाई लढली. तालिबानची पहिली ओळख तीच. परंतु, पंतप्रधान हसन अखुंद सोव्हिएट-अफगाण युद्ध न लढलेले एकमेव प्रमुख नेते असावेत. जवळपास तीन दशके तालिबानची धार्मिक धुरा त्यांच्याकडे राहिली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने उलथवून टाकलेल्या तालिबानी सरकारमध्ये ते परराष्ट्रमंत्री होते. त्यांच्या नावे असलेली मोठी कामगिरी कोणती तर बामियान प्रांतातील जागतिक वारसा असलेल्या बाैद्ध मूर्ती तोडण्याचा आदेश त्यांनी दिला होता.

अफगाणिस्तान दुष्काळ व उपासमारीने तडफडत असताना दहशतवादाच्या मुद्द्यावर मानवी विकास योजनांचा निधी संयुक्त राष्ट्रसंघाकडून थांबविला जातो; पण बामियानमधील बाैद्ध मूर्तींचे जतन करण्यासाठी मात्र युनेस्को पैसे देते, यामुळे मुल्ला उमर संतापला होता म्हणे. त्याने शुरा या धार्मिक मंचाकडून त्यावर काैल घेतला. मुल्ला हसन अखुंद शुरामधील प्रमुख धार्मिक नेता होता व त्यानेच अखंड पाषाणात खोदलेल्या सहाव्या शतकातील बामियानच्या दोन विशालकाय बाैद्ध मूर्ती तोडण्याचे फर्मान काढले, त्यानुसार स्फोटके लावून त्या तोडण्यात आल्या, असे सांगितले जाते. तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे राहतील, या प्रश्नाच्या उत्तरात हा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो. तसेही नव्या अफगाण सरकारला मान्यतेच्या मुद्द्यावर जगातील बहुतेक देश संभ्रमात आहेत. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्रालयच नाही. त्याऐवजी धार्मिक चालीरीती व परंपरांचे जतन करण्यासाठी नवे मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. महिलांचे मूलभूत हक्क, अल्पसंख्याकांचे मानवी हक्क वगैरेचे काय होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गेले दोन दिवस मृत्यूची भीती पाठीवर टाकून काबूलच्या रस्त्यावर महिलांची निदर्शने सुरू आहेत. तालिबान्यांच्या विजयाला स्वातंत्र्य म्हणणारे पाक सरकार व आयएसआय या गुप्तचर संघटनेविरुद्ध मुर्दाबादचे नारे दिले जात आहेत. तालिबान्यांची ही राजवट आधीच्या तुलनेत वेगळी व सुधारलेली असेल, समाजातील दुबळ्या वर्गाची काळजी घेतली जाईल, हा भ्रम बऱ्यापैकी दूर झाला आहे. मंत्रिमंडळ जाहीर होण्याआधी दोन दिवस काॅलेजेस उघडली व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये पडदे टाकून वर्ग भरल्याचे जगाने पाहिले. दिलासा इतकाच की, काळ्या बुरख्याऐवजी साैदी, संयुक्त अरब अमिरात किंवा कतारसारखा मुलींनी अबाया परिधान केलेला दिसला. अशा सरकारला मान्यता द्यायची तरी कशी, हा प्रश्न संपूर्ण जगासमोर आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान