शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:15 PM

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते.

- पुण्यप्रसून वाजपेयीआता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. संघाच्या स्वयंसेवकाची भूमिका मोदींसमोर लुप्त झाल्यासारखी आहे.हुमतातील सरकार दुसऱ्यांदा आपल्या बळावर सुमारे ५० टक्के मतांच्या आधारे सत्ता कायम राखेल याचा कुणी कधी विचारही केला नसेल. केवळ चार राज्ये वगळता (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पंजाब) प्रत्येक ठिकाणी भाजप अशीच धमक दाखवत सत्तेचा दोर आपल्याकडे ठेवेल. केवळ प्रादेशिक पक्षच नव्हे तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही राजकारण बदलण्याबाबत नव्याने विचार करण्याची गरज भासेल, असेही कुणाला वाटले नसेल. देशासमोर मुद्दे कायम असताना हे घडले. बेरोजगारी, शेतकरी, मजूर आणि उत्पादनाची स्थिती अशा पद्धतीने बिकट झाली की, आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यानंतर घृणा, पाकिस्तानशी युद्ध, हिंदूराष्ट्राचा विचार आणि गोडसे हे मुद्दे जिवंत करण्यात आले त्यामुळेच जनादेशासमोर मुद्दे आणि उमेदवार गौण ठरले. जाती तुटताना दिसून आल्या. उमेद आणि आस बनलेली हिंदुत्वाची झूल उडत देशभक्ती आणि राष्ट्रवादात अशा प्रकारे हरवून गेली की केवळ पारंपरिक राजकीय विचारच नव्हे तर संपूर्ण राजकीय कहाणी बदलली गेली. प. बंगालमध्ये धर्माला अफू मानणारे डावे मतदार पालटत धर्माचा जप करणाऱ्या भाजपच्या बाजूने उभे ठाकले. डाव्यांची २२ टक्के मते एकजात भाजपशी जोडली गेली.

मोदींच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मौन पाळले जावे, एवढा २०१९ चा जनादेश स्थूल नाही. कारण बंगालला लागून असलेल्या बिहारमध्ये एमवायचा जोड तुटला आहे. लालूप्रसाद यादव यांची गैरहजेरी, त्यांच्या कुटुंबातील कलह आणि महागठबंधनची एकूणच तऱ्हा पाहता यादव केवळ राजदशी जोडला गेला आहे, तसेच मुस्लिमांची मते महाआघाडीलाच मिळतील हे गृहीतक गळून पडले. तेजस्वी, राहुल, मांझी, कुशवाह, साहनी यांनी हातमिळवणी केली असतानाही महाआघाडीची झोळी रिती राहिली. केवळ नितीश-मोदी-पासवान यांचा विजयच नव्हे तर सामाजिक समीकरणही बदलल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती यांची एकजूट होऊनही यादव-जाटवांची मतेही ओढू शकले नाही. अखिलेश यादव भविष्यात ओबीसींचे नेते बनू शकणार नाहीत. मायावती यांचा सामाजिक विस्तारही केवळ जाटवांवर निर्भर राहील आणि त्यातही फूट पडत आहे, असा संकेतही दिला गेला. भाजपने हिंदूराष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या नावावर केलेले ध्रुवीकरण भारी ठरले. काँग्रेसने सपा-बसपापासून वेगळे होत उच्चवर्णीयांची मते भाजपकडून ओढण्याचा विचार केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीचा पाया रोवण्यासह संघटन बळकट करण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला जबर धक्का बसला आहे. या जनादेशात भाजप आणि काँग्रेससाठी मोठा संदेशही दडला आहे.
जनादेशानंतर काय होणार, हा अखेरचा सवाल असेल. कारण देशाने विज्ञानाला मानले नाही, विकासही समजू शकला नाही. सत्य काय हेही देशाने जाणून घेतले नाही. प्रेम, सौहार्दाची भावना नसांमधून दौडत आहे, असेही नाही. हिंदू- देशभक्त होण्याची भावना प्रबळ ठरली आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, पर्यावरण हे मुद्दे बेईमानी वाटेल अशीच स्थिती आहे.(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी