शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीस मारक

By विजय दर्डा | Published: January 21, 2019 3:56 AM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरची परिस्थिती आठवा.

- विजय दर्डाकर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरची परिस्थिती आठवा. १०४ जागा जिंकून भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. निकाल जाहीर होताच ३७ जागा जिंकणाऱ्या जनता दल (सेक्युलर) या पक्षास काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. स्वत: काँग्रेसने ७८ जागा जिंकल्या होत्या. बसपाच्या एका सदस्यानेही जेडीएसला पाठिंबा दिला. अशा प्रकारे भाजपाच्या विरोधात ११६ सदस्यांचा गट उभा राहिला. या गटाने आपल्या एकीचे पत्र राज्यपालांना दिले होते. पण तरीही राज्यपालांनी त्यांच्याहून कमी सदस्य असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले व त्यासाठी भरपूर मुदतही दिली. काँग्रेसने याविरुद्ध तत्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मध्यरात्री सुनावणीही घेतली. तरीही येदियुरप्पा यांनाच संधी मिळाली व ते मुख्यमंत्री झाले. १७ मे २०१८ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १९ मेपर्यंतची मुदत दिली.

विरोधी पक्षांमधील आठ आमदार फोडून बहुमतासाठी आवश्यक असलेली ११२ ची संख्या आपण गाठू, अशी येदियुरप्पा व त्यांच्या पक्षात बहुधा खात्री होती. कर्नाटक विधानसभेत एका नामनिर्देशित सदस्यासह एकूण २२५ सदस्य आहेत. दोन जागांची निवडणूक ऐनवेळी रद्द करावी लागल्याने बहुमतासाठी ११२ सदस्यांचा पाठिंबा पुरेसा होता. तो आकडा गाठण्यासाठी भाजपाने हरतºहेने प्रयत्न केले. पण वेळच एवढा थोडा होता की त्यांच्या गळाला विरोधकांचे पुरेसे आमदार लागले नाहीत. भाजपाने केलेले सारे शर्थीचे प्रयत्न व्यर्थ गेले. पण काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार कोणत्याही प्रलोभनांना बळी पडले नाहीत. दोन अपक्षही ठामपणे जेडीएससोबत राहिले. शेवटी बहुमत सिद्ध करता येत नाही याची खात्री पटल्यावर १९ मे रोजी येदियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले.बहुमत सिद्ध करता न आल्याने राजीनामा दिल्यानंतर लगेचच येदियुरप्पा यांनी मोठे सूचक विधान केले होते. ते म्हणाले होते की, आता स्थापन होणारे सरकार तीन महिन्यांहून जास्त टिकणार नाही. लोकशाहीत बहुमताच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या सरकारविषयी येदियुरप्पा यांनी असे भाकीत लगेच करावे यावरून कुमारस्वामींचे सरकार पाडण्याचे मनसुबे त्यांच्या आणि भाजपाच्या मनात तेव्हापासूनच होते. त्यांना तीन महिन्यांत काही करता आले नाही. पण कुमारस्वामी सरकारला आठ महिने होताच भाजपाने खरा रंग दाखवायला सुरुवात केली. कारण अधिक काळ स्वस्थ बसणे त्यांना मानवणारे नव्हते. त्यांनी ‘आॅपरेशन लोटस’ हाती घेतले. काँग्रेसच्या काही आमदारांना फोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या व जलसंसाधनमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात धुसफूस सुरू असल्याची कुणकुण लागल्याने भाजपाला हुरूप आला आणि त्यांनी प्रयत्न सुरू केले.

भाजपाच्या या प्रयत्नांत सर्वप्रथम दोन अपक्ष आमदार गळाला लागले. त्यांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. आपलेही काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे कळल्यावर काँग्रेसला चिंतेने ग्रासले. काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबई व इतरत्र हलविले. दुसरीकडे भाजपानेही आपल्या आमदारांना दिल्लीजवळच्या एका रिसॉर्टमध्ये एकत्र करून ठेवले. दरम्यान, भाजपाने लालूच दाखविलेल्या आमदारांना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी चर्चा करून विश्वासात घेतले. परिणामी सध्या तरी कुमारस्वामी सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश आलले नाही.या सर्व घटनाक्रमावरून सर्वात मोठा प्रश्न पडतो की, भारतीय जनता पार्टी असे फोडाफोडीचे राजकारण का करते? कर्नाटकच्या जनतेने त्यांच्याऐवजी इतरांवर विश्वास व्यक्त केला आहे तर भाजपाने सत्तेसाठी पाच वर्षे प्रतीक्षा करायला हवी! राजकारणात खरा फैसला जनतेच्या अदालतमध्येच होतो. अशा प्रकारे इतर पक्षांचे आमदार फोडण्याची कारस्थाने हा सरळसरळ लोकशाहीवरच घाला आहे. खासकरून असे आरोप भाजपावर व्हावेत हे अधिक गंभीर आहे.

कर्नाटक जेडीएसचे नेते के. एम. शिवलिंगे गौडा यांनी पत्रकार परिषद घेऊन असा जाहीर आरोप केला की, भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेत्तार एकेका जेडीएस आमदारास ६० कोटी रुपये व मंत्रीपदाचे प्रलोभन दाखवत आहेत. पण तरीही जेडीएसचे आमदार याला बधले नाहीत. हे आरोप गंभीर आहेत. राजकारणात अनिष्ट रूढी आणि परंपरा पाडल्या जाऊ नयेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. भाजपावर असेच इतरही अनेक आरोप झाले. नाही म्हणायला भाजपाने या आरोपांचा इन्कार केला. तरीही प्रश्न राहतोच की, राजकारणातील शुचितेचा डंका पिटणाºया भाजपावर व त्यांच्या नेत्यांवर असे आरोप व्हावेतच का? याचे कारण असे की, ते जनादेश उलटवून आपल्या बाजूने करण्याचा नापाक खटाटोप करत आहेत. या अशा प्रवृत्तीला लोकशाहीवरील हल्ला न म्हणावे तर काय?(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण