शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गगनयान मोहीम : आव्हानच नव्हे, तर राष्टÑगौरवाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:09 IST

‘गगनयान’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय मानवी अवकाश उड्डाण कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून गाजतोय

- शैलेश माळोदे (विज्ञान लेखक)‘गगनयान’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय मानवी अवकाश उड्डाण कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून गाजतोय; पण केवळ केंद्र सरकारने यासाठी ९०२३ कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१८ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील घोषणेची पूर्ती एवढंच याचं स्वरूप असणार नाही हे नक्की. गगनयान हे नाव सोयीसाठीच आहे. खरे तर ते भारतीय अंतराळवीरांना म्हणजेच ‘व्योमनॉटस्’ ली अर्थ ऑर्बिट द लिओमध्ये घेऊन जाणाऱ्या अंतराळयानाचं नाव आहे. डिसेंबर २०२१ मध्ये इस्रोने विकसित केलेल्या जीएसएलव्हीद्वारे ही मोहीम पार पाडली जाणार आहे आणि ती भारतीय अवकाश कार्यक्रमासाठी एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरणार आहे. मानवी अवकाश उड्डाण ही तर इस्रोची प्राधान्याची बाब नव्हती. मात्र, हा प्रस्ताव २००५ सालीच जी माधवन नायर अध्यक्ष असताना इस्रोने मंजुरीसाठी पाठविला होता; पण पैशांची चणचण लक्षात घेता तो बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता.व्योमनॉट्स हे नाव संस्कृतमधील ‘व्योम’ या अवकाशासाठी असलेल्या शब्दाला लक्षात घेऊन उचितपणे ठरविण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षण ही महत्त्वाची बाब असून, या दृष्टीने इस्रोचे प्रयत्न स्थानिक व परदेशी पातळीवर असणार आहेत. अवकाश स्पर्धेच्या या काळात आपले जुने मित्र राष्टÑ रशिया यासाठी उपयुक्त ठरणार आहे. काही प्रशिक्षण देशांतर्गत देता येणार आहे ही बाब अलाहिदा. या ‘व्योमनॉट्स’ची निवड इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीन (आयएएम) करणार असून यासाठी हवाई दलातील योग्य स्त्री-पुरुषांची निवड करण्यात येणार आहे.एकंदरच इस्रोने अत्यंत धीमेपणाने; परंतु तडफदारपणे या मोहिमेविषयीचे काम सुरू ठेवलं होतं. इस्रोपुढे याबाबतच्या तंत्रज्ञानाविषयीची आव्हाने मोठी असली तरी एकंदरच हे सर्व करता येण्याजोगं आहे, असा विश्वास माधवन नायर यांच्याबरोबरच सध्याचे अध्यक्ष के. शिवन यांनीही व्यक्त केलेला आहेच. काही महत्त्वाच्या तंत्रज्ञानांची निर्मिती इस्रोच्या विविध केंद्रामध्ये यशस्वीरीत्या पूर्णही करण्यात आली आहे. ही संपूर्ण मोहीम सात दिवस अवकाशात पृथ्वीभोवती ३०० ते ४०० किमी उंचीवर १००० कि.ग्रॅ. वजनाच्या कॅप्सूलमधून पूर्ण होईल. त्यापूर्वी डिसेंबर २0२0 आणि जुलै २०२१ मध्ये दोन मानवविरहित मोहिमा पार पाडण्यात येणार आहेत. एखादं यान या अवकाश स्थानक केवळ कक्षेत पाठवून भागत नाही त्यावरील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणावं लागतं. त्यासाठीचं स्पेस कॅप्सूल रिक व्हरी तंत्रज्ञान भारतानं २००७ सालीच पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने पार पडलेल्या प्रयोगाअंती साध्य केल्याचं दिसतं. त्यावर क्रू मॉड्युल अ‍ॅटमॉस्फेटिक रीएन्ट्री स्पेटिक प्रयोगाद्वारे आणि पॅड अ‍ॅबॉर्ट चाचणीद्वारे २०१८ मध्ये पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे.जीएसएलव्हीचं ह्यूमन रेटिंग सर्टिफिकेशन हा एक कळीचा मुद्दा असून त्याद्वारे एखादी विशिष्ट प्रणालीमार्फत मानवी अवकाश भ्रमण सुरक्षित असल्याचं ठरतं. त्यांची ने आण आणि सुरक्षेचं ते प्रमाणीकरण असतं. त्यासाठी इस्रोचं प्रक्षेपण सुविधेचे अद्ययावतीकरण करावं लागणार आहे. ‘एस्केप प्रणाली’ नावाचा भाग नव्यानं उपलब्ध भूमितीय माहितीच्या आधारे अधिक कार्यक्षम असणार आहे. या संदर्भातले पॅराशूट विस्तारीकरण आणि नवीन आर्किटेक्चर याबाबत काम सुरू आहे. एकंदरच ९९.८ टक्के ही प्रणाली अवलंबून राहण्याजोगी असेल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा या संपूर्ण मोहिमेसाठी अपग्रेड करण्यात येत आहे. इस्रोने तयार केलेली प्रश्नावली भरून दिल्यानंतर विविध शारीरिक आणि मानसिक चाचण्यानंतर २०० पैकी चार गुणांची निवड प्रथम अवकाश प्रशिक्षणासाठी केली जाईल. हे प्रशिक्षण बंगळुरू येथील केम्पेगॉडा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १४० एकरांच्या क्षेत्रात पार पडेल. विविध प्रकारचे प्रयोग या मोहिमेतून करण्यात येणार आहेत. त्यांची मांडणीही करण्यात येत आहे. यासाठी एक सूक्ष्मगुरुत्वीय प्लांट उभारण्यात येणार आहे. शेवटी ही मानवरहित अवकाश मोहीम असणार आहे. त्याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित डिफेन्स फुड रिसर्च लॅबमध्ये ट्रायल्स सुरू करण्यात आल्या आहेत, त्या स्पेस सूट इस्रोच्या गरजेनुसार एका खासगी कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला असून त्यांचे वजन १३ कि.ग्रॅ. असेल.ही ‘गगनयान’ मोहीम फत्ते झाल्यास मोविएस (रशिया), अमेरिका आणि चीननंतर अशा प्रकारची क्षमता असणारं भारत हे चौथे राष्टÑ ठरणार आहे. तसेच यामुळे देशातील तरुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच देशातील विज्ञान तंत्रज्ञानविषयक ‘टेम्पर’ वृद्धिंगत होईल यात शंका नाही. त्यामुळे इस्रो अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव के. शिवन म्हणतात त्याप्रमाणे ही राष्ट्राला गौरव देणारी एक महत्त्वाची भेट असणार आहे.

टॅग्स :isroइस्रोscienceविज्ञान