शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पैसा...पैसा... वाढत वाढे पेट्रोल डिझेलचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:53 IST

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला.

- धर्मराज हल्लाळे

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ही इंधन दरवाढ सातत्याने झाल्याने मोठ्या शहरांत भाजीपाल्यांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले. सर्वसामान्य जनतेत संताप आहे. काँग्रेस आणि सर्व विरोधक एकवटले. भारत बंदसाठी रस्त्यावर उतरले. परंतु कें द्रातील पर्यटनमंत्री म्हणतात, कार चालकांकडे पैसे भरपूर आहेत, त्यांना काही कमी नाही. एकूणच जनतेच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देण्याऐवजी मंत्री वादग्रस्त विधाने करुन सरकारलाच अडचणीत आणत आहेत. पेट्रोल डिझेल केवळ चारचाकी कारलाच लागत नाही. सामान्य माणसांच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तु वाहून आणणाºया ट्रकलाही लागते. ज्यामुळे जनता भाववाढ अर्थात महागाईने त्रस्त झाली आहे. 

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू असताना १० सप्टेंबर रोजीही परभणीत ८९.८८ रुपये तर अमरावतीत ८९.३७ रुपये दराने पेट्रोल मिळत आहे. सरकारमधील मंत्र्याला वाटते तसे कारचालक हे पेट्रोल, डिझेल वाढले म्हणून काही उपाशी राहत नाही. परंतू  सामान्यांचे जगणे मुश्किल होते, हेही सत्ताधा-यांना समजत नसेल तर पेट्रोल डिझेलचा भडका निवडणुकीत उडाल्याशिवाय राहणार  नाही. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता महागाईच्या स्फोटक स्थितीतही सरकार पक्षातील काहीजण गंमतीशीर तुलना करत आहेत. देशातील सर्व गावांमध्ये वीज पुरवठा करायचा आहे, शौचालये बांधायची आहेत. विकास प्रत्येकाच्या दारात घेऊन जायचा आहे, मग कर रुपाने पैसा गोळा करावाच लागेल असे समर्थन करणारेही महाभाग आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती युपीए काळातील किंमतीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी कमी आहेत. तरीही इंधन दरात दिवसेंदिवस वाढ होत आह़े. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असल्याने आयात खर्चाचा प्रश्न आहे. परंतु ही घसरण थांबवणे, इंधन दरावर नियंत्रण आणणे सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ता पक्षातील सर्वच नेत्यांनी युपीए काळातील इंधन दरवाढीवर रान उठविले होते.

त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती उसळल्या होत्या. तुलनेने आजची स्थिती बरी असतानाही विद्यमान सरकार इंधन दरवाढीचा आलेख का उंचावत आहे हा सामान्यजणांना पडलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेती आणि शेतक-यांचे प्रश्न, ज्यामध्ये आत्महत्या, हमीभाव यावर जनतेत सरकारबद्दल नाराजी आहे. त्यातही शहरी भाग तुलनेने सरकारला जो काही अनुकूल होता तोही आता इंधनाच्या भडक्यात होरपळून निघत आहे. सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले वा काय केले नाही याची चर्चा करताना लोक मोदी सरकारने चार वर्षात काय केले हेही विचारणार आहेत. नोटाबंदीत पैसेवाला मोठा माणूस अडचणीत आला, आपला काही सबंध नाही, काळा पैसा आता जणू नदी, नाल्यांमध्ये दिसेल अशी स्वप्ने रंगवली गेली. नोटाबंदीच्या रांगेत हाल झाले तरी अनेकांना काळ्या धनावर टाच येईल याचा आनंद झाला. मात्र रिझर्व्ह बॅकेच्या अहवालानंतर नोटाबंदीचे फलित सांगणे हे सरकारसमोर मोठे आव्हान आहे. तसेच शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणाही हवेत विरल्या. हमीभावाचा प्रश्न सोडविता आला नाही. महाराष्ट्रात तूर, हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आले. येणा-या काळात सरकारने साखर निर्यात अनुदानात वाढ नाही केली तर ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा संकटात येणार आहे.

एकंदर गेल्या काही काळात केलेल्या घोषणा आणि आश्वासने सरकार समोरील डोके दुखी आहे. अच्छे दिन हा शब्दच गले कि हड्डी बना है, हे जबाबदार मंत्र्याचे विधान त्याच भावनेने समोर आले होते. पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबतही सत्ताधा-यांची कालची आणि आजची विसंगत भूमिका जनतेला पटणार नाही. इतकेच नव्हे लोक हेही सांगू लागले आहेत, चार वर्षांत वाढवलेल्या दरात ऐन निवडणुकीत घट केला जाईल. भाजपाशासित राज्यांना व्हॅट कमी करुन दर खाली आणण्याचा उपाय सांगितला जाईल. शेवटी ‘ ऐ जो पब्लिक है, ऐ सब जानती है’.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल