शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

निव्वळ आरोपांचा धुराळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 9:00 AM

मिलिंद कुलकर्णी  राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी ...

मिलिंद कुलकर्णी 

राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी आरोप केले तर ते त्यांच्या भूमिकेनुसार ते आरोप करणारच असे म्हटले जाते, पण सत्ताधारी मंडळींनी आरोप केले तर त्यांनी पुरावे द्यायला हवे, तरच त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे जनतेला वाटेल. अन्यथा आरोपांचा निव्वळ धुराळा उडवल्यापलिकडे काहीही साधले जात नाही. 

देशातील राजकीय स्थिती विचित्र  आहे. केद्र सरकार भाजपचे आहे, महाराष्टÑात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तासंतुलन साधले गेले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याकडे सत्ताधारी आणि विरोधक अशी भूमिका येते. ही भूमिका वठवत असताना निव्वळ हवेत वार करण्यापेक्षा पुराव्यासह आरोप केले तर त्याला वजन प्राप्त होते आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पडते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे या बहुदा एकमेव सदस्या आहेत, ज्या सत्ताधारी भाजपच्या सदस्या असूनही पुराव्यासह गैरव्यवहार उघडकीस आणतात. मग तो स्वस्त धान्य दुकानातील मापाचे पाप असो की, तलावातील गाळ, गौण खनीज उचलण्यात झालेला गैरव्यवहार असो, त्यांनी पुराव्यासह आरोप केले. प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि कारवाई करण्यास भाग पाडले. बाकी मंडळी आरोप खूप करतात, पण त्याच्या पुराव्यांचा पत्ता नसतो. राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे आरोपांचा धुराळा उडविण्यात माहीर आहेत. त्यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गांजाशेतीविषयी पत्रकार परिषद घेऊन महसूल, वन, कृषी आणि पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी पीक पाहणी करायला शेतात जातात, तेव्हा त्यांना गांजाची शेती लक्षात येत नाही काय? पेरा वेगळा का दाखविला जातो, ही कोणाची शेती आहे आणि त्यांची नावे का लपवली जातात, हा त्यांचा मुद्दा रास्त आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीदेखील योग्य आहे. मात्र त्यांनी जे इतर आरोप केले त्याविषयी खरेतर त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करायला हवी. चौकशीसाठी पाठपुरावा करायला हवा. तसे न करता गोटे हे पत्रकार परिषद घेऊन नेमके काय साधू इच्छितात, हे कळायला मार्ग नाही. गोटे यांनी पोलीस दलातील बदलीचा मुद्दा उपस्थित करुन आरोप केला की, शिरपूर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी ५० लाख ते एक कोटीची बिदागी द्यावी लागते.  शिरपूर, सांगवी व थाळनेर येथील पोलीस ठाण्यात बदलीसाठी २५ ते ८० लाख रुपये मोजावे लागतात. तलाठी बदलीचा दर किमान दोन ते पाच लाखापर्यंत आहे. असे जर असेल तर गोटे हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करावी, पुरावे असतील तर ते द्यावे, आणि कारवाईसाठी आपल्याच सरकारला भाग पाडावे. असाच आरोप जळगावातील राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देऊन केला आहे. चार पोलीस कर्मचाºयांची नावे देऊन हे कर्मचारी एका माजी मंत्र्याच्या सेवेत आहेत, आणि त्यांच्याविषयी तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. पुन्हा तेच, गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षभरात तीनवेळा जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. दर आठवडयाला त्यांचा जनता दरबार मुंबईत होत असतो. राष्टÑवादीचे अनेक पदाधिकारी तेथे जाऊन निवेदने देतात. मग पाटील, यांनी हा मार्ग का चोखाळला नाही? असाच आरोप त्यांनी जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर वॉटरग्रेस या स्वच्छता कामाच्या ठेकेदार कंपनीकडून दरमहा बक्षीसी मिळत असल्याबद्दल केला होता. निव्वळ आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली तर चौकशी लागू शकते. शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक देखील भाजपच्या कारभाराविरोधात कधी आंदोलन करतात तर कधी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन तक्रारी करतात. पण पुरावा हाती घेऊन एखादे प्रकरण धसास लावले, असे काही घडत नाही. यामुळे होते काय, जनतेला या आरोपांमध्ये तथ्य वाटत नाही. आरोप होतात, प्रसिध्दी मिळते आणि चार दिवसांनी सगळे शांत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.रामदास नायक यांनी प्रतिभा प्रतिष्ठानमधील गैरव्यवहार उघडकीस आणला आणि तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाची आठवण याप्रसंगी होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव