शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

विकास व विनाश एकत्र नांदू शकत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 4:27 AM

दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही.

- एम. व्यंकय्या नायडूकशाहीचे आणि जनतेच्या आकांक्षांचे सजीव प्रतीक असलेल्या आपल्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा भयानक हल्ला परतवून लावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सुरक्षा दलांच्या व इतरांच्या बहाद्दुरीचे या दिवशी स्मरण करत असतानाच आपल्या मातृभूमीचा इंचन्इंच भाग पूर्णपणे सुरक्षित करण्याच्या निर्धारासोबतच दहशतवादाच्या वाढत्या उपद्रवाचे जगातूनही उच्चाटन करण्यासाठी आपल्याला राजनैतिक पातळीवर नेटाने प्रयत्न करावे लागतील.या हल्ल्यात आपल्या सुरक्षा दलांचे सहा जवान शहीद झाले. देशाच्या सीमांचे रक्षण करणारे लष्कराचे शूर जवान, आपल्या जीवित-वित्ताची काळजी घेणारे पोलीस आणि आक्रमक, दहशतवादी व समाजकंटकांशी सदैव मुकाबला करणारी आपली अर्र्धलष्करी सैन्यदले नक्कीच कौतुकास पात्र आहेत. त्यांची व्यक्तिनिरपेक्ष कर्तव्यनिष्ठा आणि देशाची सुरक्षा व जनतेची सुरक्षितता याविषयी त्यांची अतूट बांधिलकी आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. आपल्या विकासयात्रेसाठी अनुकूल वातावरण कायम ठेवण्यातील त्यांचे योगदान विसरून चालणार नाही.दहशतवाद ही संपूर्ण मानवतेला जडलेली व्याधी असून तिच्या निर्मूलनासाठी आपल्याला इतरांना सोबत घेऊन मजबूत आघाडी उघडावी लागेल. संसदेवरील व मुंबईवरील दहशतवादी हल्ले हे आपल्या समाजमनावर कोरले गेलेले कधीही न भरून निघणारे ओरखडे आहेत.सीमेच्या पलीकडून येणाºया दहशतवादास भारत गेली कित्येक वर्षे तोंड देत आहेच; पण गेल्या काही वर्षांत दहशतवादाच्या या भस्मासुराने इतरही अनेक देशांत थैमान घातले आहे. यास सर्वंकषपणे पायबंद करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समझोता करण्याचा प्रस्ताव भारताने १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात मांडला, पण अद्याप तो मंजूर झालेला नाही. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचे कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादी हा दहशतवादीच असतो व त्यात चांगला आणि वाईट दहशतवाद असा भेदभाव केला जाऊ शकत नाही. संसदेवरील राक्षसी हल्ला आणि मुंबईतील महाभयंकर हल्ला या दोन्हींमुळे भारतीयांच्या मनात संतापाची भावना आजही कायम आहे. सर्व प्रकारच्या विघातक, विध्वंसक आणि अराजकवादी शक्तींचा बीमोड करण्याचा आपला निर्धार या दोन्ही घटनांनी आणखी मजबूत झाला आहे.या हल्ल्यामागचे सीमेच्या पलीकडे शिजलेले कारस्थान उघड करण्यात मुंबई पोलीस आणि ‘एनआयए’ने केलेली कारवाई स्पृहणीय आहे. विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर उज्ज्वल निकम यांची कायद्यातील मातब्बरी व निर्विवाद पुराव्याच्या जोडीला केलेला बिनतोड युक्तिवाद यामुळे मुंबई हल्ल्यातील एका गुन्हेगाराला फासावर लटकविणे शक्य झाले. परंतु दहशतवादाचे हे विखारी जाळे अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. तेच मुळातून उखडून टाकणे गरजेचे आहे. या भयंकर घटनांच्या पडद्यामागील सूत्रधारांच्या मुसक्या आवळून त्यांना कायद्यापुढे उभे करणे नितांत गरजेचे आहे. देशपातळीवर आपल्याला सागरी आणि किनारी सुरक्षेसह एकूणच सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी लागेल.मने विखाराने ठासून भरलेल्या व मानवी जीव आणि मानवी हक्क यांची जराही किंमत नसलेल्या मोजक्या लोकांना संपूर्ण जगाला वेठीला धरू दिले जाऊ शकत नाही. विशेषत: भारतात काही लोकांनी मानवी हक्कांच्या नावाखाली दहशतवाद्यांविषयी गळा काढावा हा दुर्दैवी विरोधाभास आहे. आपण भारतीयांनी देशात आणि देशाबाहेरून आणि खास करून सीमेच्या पलीकडून दहशतवाद पसरविणाºयांविरुद्ध अधिक निर्धाराने उभे राहावे लागेल. या नतद्रष्ट प्रवृत्तींना देशातून आणि देशाबाहेरून खतपाणी घालणाºया गटांचाही जाहीरपणे निषेध केला जाणे तेवढेच गरजेचे आहे.दहशतवादी कृत्यांनाही धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद हा मुळातच अमानवीय असून कोणत्याच धर्माची त्याला मान्यता नाही. यामागे चुकीची, विकृत आणि अमानवी अशी विचारसरणी आहे. याचा मुकाबला मने वळवून व चर्चा करून तसेच प्रसंगी जरब बसेल असा बळाचा वापर विवेकाने करूनच करावा लागेल.भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असताना आणि नानाविध आव्हानांना तोंड देत असताना आपल्या विकासाच्या उद्दिष्टांना काडीभरही हातभार लागणार नाही अशा बाबींवर नाहक शक्ती खर्च करणे आपल्याला परवडणारे नाही. भारतात आणि दक्षिण आशियातील इतरही देशांमध्ये बरीच मोठी लोकसंख्या दारिद्र्यात आहे. एक देश म्हणून आपले लक्ष लोकांचे जीवनमान सुधारण्यावर केंद्रित व्हायला हवे. विकास आणि विनाश एकत्र नांदू शकत नाहीत. मात्र शांतता व विकास हे दोन्ही परस्परपूरक आहेत. आपल्याला शांततेच्या शक्तींना सतत बळकटी द्यावी लागेल व त्यांच्या विरोधात काम करणाºया हिंसाचारी आणि दहशतवादी शक्तींना निरंतर ठेचत राहावे लागेल.(लेखक उपराष्ट्रपती आहेत)

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाIndiaभारत