शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 03:17 IST

सामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. धार्मिक असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने ठामपणे उभे राहिले. आज त्यांची १२५ वी जयंती. भारताचे राजकीय

- सुशीलकुमार शिंदेसामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. धार्मिक असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने ठामपणे उभे राहिले. आज त्यांची १२५ वी जयंती. भारताचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकजीवन कसे असावे, याविषयी बाबासाहेबांचे काही ठाम विचार होते. कोणाचीही पर्वा न करता कायम त्यांनी मुक्तपणे त्यांचा पुरस्कार केला. बाबासाहेबांना भारतात मिळणारे समर्थन पाहिल्यावर ब्रिटिश सरकारने १९३१ सालच्या गोलमेज परिषदेसाठी त्यांना लंडनला निमंत्रित केले. महात्मा गांधींबरोबर भारतात सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवणारा ऐतिहासिक पुणे करार या परिषदेच्या पार्श्वभूमीवरच पुण्यात येरवड्याला झाला.बाबासाहेबांची अलौकिक विद्वत्ता आणि दलितांबाबत त्यांच्या मनातली करुणा, महात्माजी आणि पंडित नेहरूंनी या वेळी बारकाईने न्याहाळली. दोघांच्या पुढाकारानेच बाबासाहेबांकडे भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्षपद चालत आले. प्रत्येकाला मताधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणारी अलौकिक राज्यघटना, डॉ. आंबेडकरांनीच भारतीय लोकशाहीला प्रदान केली. स्वतंत्र भारताच्या राजकीय व्यवस्थेचा पायाच या घटनेने रचला गेला. भारताच्या सामाजिक जीवनाला दिशा देणाऱ्या या महानायकाने असहिष्णुतेच्या विरोधात सातत्याने प्रखर लढा उभा केला. मागासवर्गीय समाजाला पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. दलित समाजाला हिंदू मंदिरांत सन्मानाने प्रवेश मिळावा, यासाठी नाशिकला काळाराम मंदिर सत्याग्रह केला. बाबासाहेबांच्या सामाजिक संघर्षाची ही दोन ज्वलंत प्रतीके आहेत. माणुसकीच्या आग्रहासाठी झालेल्या या सत्याग्रहांनी देशभर दलित समाजात अस्मिता जागवली. ‘शिक्षणाची कास धरा, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा अव्दितीय गुरुमंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला. विविध धर्म व त्यांच्या रूढी व परंपरांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर, १९५0 च्या दशकात डॉ. आंबेडकरांना शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे आकर्षण वाटू लागले. बौद्ध भिक्कू व विद्वानांच्या संमेलनात भाग घेण्यासाठी याच सुमारास बाबासाहेब श्रीलंका व ब्रह्मदेशात गेले. अंतत: हिंदू धर्माचा त्याग करून , नागपूरच्या दीक्षाभूमीत त्यांनी स्वत: ८ लाख अनुयायांसह बौद्ध धर्माचा विधीवत स्वीकार केला. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले.भारतात सर्वत्र धार्मिक द्वेषाची आणि सामाजिक असहिष्णुतेची बीजे आज राजरोस रोवली जात आहेत. अशा वेळी त्या महानायकाच्या शिकवणीचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. १२५ व्या जयंती दिनी डॉ. बाबासाहेबांना मन:पूर्वक आदरांजली.