शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

विमानातील संगणकाची चूक ठरते मृत्यूला जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:24 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान दौडीमुळे गेल्या दहा-वीस वर्षांत जगातील सर्वच बाबींचे स्वरूप आरपार बदलून गेले.

- डॉ. दीपक शिकारपूर माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान दौडीमुळे गेल्या दहा-वीस वर्षांत जगातील सर्वच बाबींचे स्वरूप आरपार बदलून गेले. संगणकांना आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कितपत प्रवेश द्यावा, त्यांना कितपत निर्णयस्वातंत्र्य द्यावे, उद्या संगणक मानवाच्याच डोक्यावर बसणार नाही ना... अशा अनेक मुद्द्यांवर सतत चर्चा होते आहे. हे सर्व अतीव महत्त्वाचे झाले. लायन एअर कंपनीचे विमान इंडोनेशियामध्ये उडाल्यानंतर काही काळातच समुद्रात कोसळून त्यामधील सर्व प्रवासी व कर्मचारी मिळून १८९ व्यक्तींना जलसमाधी मिळाली. असे निष्पन्न होत आहे की बोइंग कंपनीने त्यामध्ये बसवलेली टउअर (मॅनूव्हरिंग कॅरेक्टरिस्टिक आॅगमेंटेशन सिस्टिम) ही वैमानिकाला साहाय्य करणारी सॉफ्टवेअर प्रणाली बिघडल्याने ही दुर्घटना घडली.सद्यघटनेतले ‘बोइंग ७३७ मॅक्स एट्’ हे विमान लायन एअरच्या ताफ्यात तीन महिन्यांपूर्वी दाखल झाले होते. हे विमानच फक्त नवीन नव्हते तर बोइंग कंपनीने त्यामध्ये बसवलेली टउअर (मॅनूव्हरिंग कॅरेक्टरिस्टिक आॅगमेंटेशन सिस्टिम) ही वैमानिकाला साहाय्य करणारी सॉफ्टवेअर प्रणालीही त्यामध्ये प्रथमच वापरात येत होती. आपला विषय असलेल्या फ्लाइट खळ610 वरचा, कॅप्टनच्या बाजूचा, अडअ संवेदक खराब झाल्याचे संबंधित चालकाने, बालीहून निघतानाच जकार्ता विमानतळाला कळवले होते. बालीहून आलेले हे विमान जकार्ताला उतरल्याबरोबर लगेचच ही दुरुस्ती केली गेली होती. परंतु या विमानाची इंजिने, टउअर सॉफ्टवेअर, त्याला माहिती देणारे कोन-संवेदक... ही संपूर्ण यंत्रणाच नवीन असल्याने तिच्याबद्दल सखोल माहिती कोणालाच नव्हती, अगदी देखभाल करणाऱ्यांनासुद्धा! चालकाला तर याबाबतचे प्रशिक्षणही दिलेले नव्हते! अशा स्थितीत, संवेदक दुरुस्त झाल्यावर, हेच विमान दुसºया म्हणजे ‘त्या’ दिवशी सकाळी जकार्ताहून उडाले.थोड्या वेळाने संवेदकाने नियंत्रक संगणकाला सांगितले की, विमान स्टॉल होण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार, पुढच्याच सेकंदाला त्याने विमानाचे नाक खाली केले. दरम्यान, काय होते आहे हे चालकाच्या ध्यानात आले. परंतु त्याने संगणकाची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेस्तोवर वेळ निघून गेली होती आणि विमानाने समुद्राच्या दिशेने सूर मारलीही होती. बरे विमानाने हवेत पुरेशी उंची गाठलेली नव्हती त्यामुळे सूर मारणारे विमान पुन: वर घेण्यासाठी आवश्यक असलेला हवेचा दाब मिळू शकत नव्हता. हे विमान संगणकाने अक्षरश: समुद्रात घातले, त्यामधील १८९ लोकांसहित! काही दिवसांनी बोइंग कंपनीने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले की, कोन-संवेदकाच्या संदर्भात काहीही समस्या निर्माण झाली तर त्यावरचा सर्वप्रथम रामबाण उपाय म्हणजे संगणक चक्क बंद (स्विच आॅफ) करणे! चालकाला ही बाब माहीत नव्हती असे गृहीत धरायला हरकत नाही. कारण हा उपाय त्याला माहीत असता तर अर्थातच त्याने तो वापरला असता असेही म्हणता येईल. त्याने, विमानाचे नाक (विनाकारण) खाली जाऊ लागल्यावर, संगणकाला बाजूला सारून स्वत:च्या हाती नियंत्रण घेतले असते तर पुढच्या त्या अतिमहत्त्वाच्या एका सेकंदात कदाचित हे दुर्दैवी चित्र पालटलेही असते! या घटनेनंतर एका वेगळ्या (पण तसे पाहिले तर संबंधित) मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे, ‘ज्या गोष्टी मनुष्य स्वत:च्या कौशल्यावर करू शकतो त्या सगळ्याच संगणकाच्या हाती सोपवण्याची खरेच गरज आहे काय?’ आणि जर संगणकाच्या चुकीने मृत्यू अथवा गुन्हे घडले तर त्याला जबाबदार कोण?

(उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)